जिल्हा सामान्य रुग्णालय जळगांव दलालांच्या विळख्यात
कोरोना विषाणू प्रमाणे वाढत आहेत दलाल
क्रमशः….
लवकरच होईल कागदोपत्री खुलासा
प्रा.जयश्री दाभाडे
दिव्यांग दाखला मिळावा यासाठी संपूर्ण जिल्ह्यातील दिव्यांग बांधव हे जिल्हा सामान्य रुग्णालय जळगाव यांच्याकडे येऊन शासनाच्या नियमानुसार आठवड्यातून बुधवार हा दिवस दिव्यांग बांधवांना अपंगत्वाचे दाखले मिळणे साठी दिलेला आहे शासनाने नवीन २१ प्रकारचे दिव्यांग समाविष्ट केल्यावर SADM प्रणाली नुसार सन २०१८ पासून दाखले देणे बंद केले आहेत व www.swavlambancard.com या केंद्र सरकारच्या नवीन प्रणालीनुसार दिव्यांग दाखले देने बंधनकारक आहे.परंतु नियमाप्रमाणे दिव्यांग व्यक्तीस अपंगत्वाचे दाखले दिले जात नसल्याने दिव्यांग बांधवांनी नाराजी व्यक्त केली आहे.
ज्या दिव्यांग बांधवांचे SADM प्रणाली वरून कायमस्वरूपी अपंगत्व दाखले दिले गेले आहे असे दिव्यांग व्यक्ती जेव्हा युनिक कार्ड साठी गावातून ५० ते ६० कि.मी अंतरावरून अनेक त्रास सहन करून जिल्हा सामान्य रुग्णालय जळगांव यांच्या कडे जातात.तेव्हा केस पेपर काढून रांगेत तासंतास उभे राहावे लागते जेव्हा या बांधवांचा नंबर येतो तेव्हा त्याने फ़ॉर्म व्यवस्थित भरला आहे की नाही याची पडताळणी केली जाते फॉर्म भरतांना आधार कार्ड नंबर शी लिंक आहे की नाही हे बघिले जाते जर काही किरकोळ चूक झाली असेल तर लगेच त्याला दुरुस्तीसाठी पाठवण्यात येते. काहींना एक्स रे काढावयास सांगितले जाते जरी हे सगळे नियमाप्रमाणे चालले असले तरी काही दिव्यांगांच्या बाबतीत नियमांची पायमल्ली होत असल्याचे दिसून आले आहे. चूक दुरुस्त करून जेव्हा परत दिव्यांग बांधव हा पुढच्या बुधवारी फॉर्म जमा करावयास जातो काही जमा होतात तर नियमात बसत नाही म्हणून फेटाळले जातात. दिव्यांग व्यक्ती आपला दाखला ऑनलाईन काढतो तेव्हा त्यास कायमस्वरूपी ऐवजी त्यास तात्पुरते दाखले दिले गेले असल्याचे समजते. जेव्हा फेटाळून लावल्या नंतर या दिव्यांग बांधवांना दलालांन व्यतिरिक्त दुसरा रस्ताच सापडत नाही तेव्हा जवळपासच्या परिसरातील हजर असलेले दलाल हे दिव्यांगांची आर्थिक लूट करून फेटाळून लावलेले प्रकरण देखिल सहजपणे जमा केले जात असल्याचे निदर्शनास आले आहे मागील २ महिन्यापूर्वी जिल्हाधिकारी जळगांव यांच्या बैठकीत जळगांव जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.गुलाबराव पाटील यांनी म्हटले होते की जर दिव्यांग बांधवांकडून दाखला मिळावा यासाठी कोणीही पैसे मागत असेल तर मला फोन करा असे आवाहन केले होते परंतु या आवाहनाला जास्त प्रतिसाद मिळाला नाही व जैसे थे तीच परिस्थिती जिल्हा रुग्णालयात आहे दिवसेंदिवस दलालांची संख्या ही कोरोना व्हायरस प्रमाणे झपाट्याने वाढत असून रुग्णालय परिसरातील दलालांवर कायदेशीर कारवाई व्हावी अशी मागणी दिव्यांग बांधवांकडून वारंवार होत आहे.या संदर्भात लवकरच ठोस प्रहार न्युज च्या संपादिका कागदोपत्री पुराव्यासह दलालांच्या चेहऱ्यावरील मुखवटा जनतेसमोर येणार असल्याचे म्हटले आहे.






