औसा पत्रकांराच्या वतीने विलासराव देशमुख यांना जयंतीनिमित्त अभिवादन
औसा प्रतिनिधी:-प्रशांत नेटके
ठोस प्रहार वृत्तसेवा:-
औसा :-राजकारणाला समाजकारणाचे माध्यम समजून सर्वसामान्यांच्या सर्वांगीण विकासाचे स्वप्न उराशी बाळगणारे लोकनेते माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची ७५ वी जयंती मंगळवार दि २६ मे २०२० रोजी सामाजिक अंतर पाळत अत्यंत साध्या पध्दतीने औसा पत्रकाराकडून साजरा करण्यात आली.
सध्या संपूर्ण जगावरच कोविड१९चे संकट कोसळले आहे. या कोविड१९ विषाणुचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सध्या राज्य आणि देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे.वैयक्तिक शारिरीक आंतर पाळून या विषाणुचा प्रसार रोखण्याच्या उपाययोजना करण्यात येत आहेत.यावेळी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष संजय सगरे,राम कांबळे,बालाजी उबाळे, विठ्ठल पांचाळ,तसेच आत्माराम मिरकले,विनोद जाधव,रमेश दुरुगकर आदी उपस्थित होते.






