Amalner

मध्यरात्री धार येथे चोऱ्यांची मालिका, २ लाख ३४ हजारांचा ऐवज लंपास… चोरट्यांनी गावात तब्बल सात ठिकाणी मारला डल्ला…

मध्यरात्री धार येथे चोऱ्यांची मालिका, २ लाख ३४ हजारांचा ऐवज लंपास… चोरट्यांनी गावात तब्बल सात ठिकाणी मारला डल्ला…

रजनीकांत पाटील

अमळनेर :- तालुक्यातील धार येथे दि. २ रोजी मध्यरात्री गावात तब्बल सात ठिकाणी चोरी झाल्याचे उघडकीस आले असून याप्रकरणी मारवड पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी सुनिल नामदेव पाटील (राहणार धार) यांच्या राहत्या मागच्या मागील बाजूस त्यांचीच शेतजमीन आहे. दि. १ ऑगस्ट रोजी नेहमीप्रमाणे कामे करून सायंकाळी घरी येऊन रात्री साडेनऊच्या सुमारास झोपी गेलो. तेव्हा फिर्यादीची पत्नी सोनिया हिने मागील दरवाजा कडी लावलेली नव्हती. त्यानंतर दिनांक २ रोजी सकाळी चार वाजेच्या सुमारास पत्नी सोनिया तिने उठल्यावर पाहिले की, सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असलेली कोठी दिसली नाही. तेव्हा मागील बाजूस असलेल्या शेतीत बघितले असता घरातील धान्याची कोठी कपडे साड्या अस्ताव्यस्त पडलेले दिसले व कोठीतील सोन्याचे चांदीचे दागिने व रोख रक्कम दिसले नाही. तेव्हा लागलीच गावातील पोलीस पाटील यांना या घटनेबद्दल माहिती दिली. त्यानंतर घराला लागूनच असलेले फिर्यादीचे मोठे भाऊ अनिल नामदेव पाटील यांच्या घरात सुद्धा चोरी झाली असून त्यांच्या घरातील सोन्या-चांदीचे दागिने लंपास झाले आहेत. याबरोबरच गावातील इतर पाच लोकांच्या घरात व चोऱ्या झाल्याचे उघडकीस आले. तसेच चोरट्यांनी अब्दुल रज्जाकशा कादरी बाबा दर्गाचे दोन्ही गल्ल्यांचे कुलूप तोडलेले व दर्ग्याचे समोरील बाजूस असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरे तोडून नुकसान केलेले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button