Jalgaon:भारतीय सनदी अधिकाऱ्यांचे ऑडिट झाले पाहिजे..- ई.झेड. खोब्रागडे
जळगाव :- भारतीय समाज व्यवस्थेतील तळागाळातल्या सामान्य सामान्यातल्या माणसाला भारतीय लोकशाहीचा अर्थ समजावून सांगत त्यांच्या गरजा लक्षात घेत सनदी अधिकाऱ्यांनी त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणे काळाची गरज असून भारतीय अधिकाऱ्यांचे सोशल ऑडिट करण्याची आता वेळ आली असून अधिकाऱ्यांनी जबाबदारीचे भान ठेवत भारतीय संविधान आणि भारतीय लोकशाहीला जिवंत ठेवण्याकरता आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्याची वेळ आता आली असल्याचे मत माजी सनदी अधिकारी तसा तथा संविधान अभ्यासक ई.झेड. खोब्रागडे यांनी आप्पासाहेब झाल्टे प्रतिष्ठान व महाराष्ट्र जनक्रांती मोर्चा तर्फे भारतीय संविधान गौरव आणि प्रजासत्ताक दिनाच्या अनुषंगाने आयोजित कार्यक्रमाप्रसंगी आपल्या मनोगत मांडणी करताना विचार व्यक्त केले ते पुढे म्हणाले जाती धर्माच्या नावाने देशात विष पेरण्याचे काम होत आहे. संविधानाने समानता दिली असली आपण निवडून दिलेले लोक प्रतिनिधी बेजबाबदार असतील तर देश कसा चालेल असा सवाल देखील त्यांनी केला. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष मुकुंद सपकाळे हे होते.
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील अल्पबचत भवन सभागृहात आयोजित कार्यक्रमात ई.झेड.खोब्रागडे यांनी संविधानाचा लोककल्याणकारी उद्देशाची सखोल माहिती विविध उदाहरणे देऊन सांगितली. ते म्हणाले की, संविधानाने धर्म निरपेक्षता सांगितली असली तरी शाळा महाविद्यालयात धार्मिकता जोपासली जाते हे वास्तव आहे.या मुळे देशाची एकात्मता व सामाजिक समतेचा विचारांचा प्रचार व प्रसार करण्याची शिक्षकांवर मोठी जबाबदारी आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मुकुंद सपकाळे यांनी आपल्या विचार व्यक्त करतांना सांगितले की, अन्याय अत्याचार विरोधात आवाज उठवण्यासाठी प्रत्येकाने कर्तव्य समजून उभे राहणे आवश्यक असून देशाची एकता,अखंडता संविधाना मुळे टिकून राहिली आहे.
यावेळी प्राचार्य एस.एस.राणे,डॉ. करीम सालार यांनीही आपले विचार व्यक्त केले. प्रमुख पाहुणे म्हणून अशोक बिऱ्हाडे,सुरेंद्र पाटील,नगरसेवक सुरेश सोनवणे,मुकुंद नन्नवरे,रेखाताई खोब्रागडे,रत्नमाला बिऱ्हाडे उपस्थित होते.
प्रास्ताविक डॉ.मिलिंद बागुल यांनी केले.सूत्रसंचालन हरिश्चंद्र सोनवणे तर आभार बापूराव पानपाटील यांनी केले.
कार्यक्रमाला विजयकुमार मौर्य, भारत ससाणे,सचिन धांडे,प्रा.सी.पी. लभाने, प्रा.डॉ.सत्यजीत साळवे, फहीम पटेल, दिलीप सपकाळे,भारती म्हस्के,अमोल कोल्हे,फारुक काद्री,वाल्मीक सपकाळे,विनोद निकम,शिरीष चौधरी यांच्यासह शहरातील सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यशस्वितेसाठी रमेश सोनवणे,चंदन बिऱ्हाडे,जयपाल धुरंदर,महेंद्र केदार, नीलू इंगळे,चंद्रमणी नन्नवरे,समाधान सोनवणे,बापूराव पानपाटील,विजयकुमार मौर्य,आकाश सपकाळे,जगदीश सपकाळे, आदींनी परिश्रम घेतले.






