राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघ चोपडा युनिट चे कामगार कायद्यांच्या विरोधात कालीफित आंदोलन.
हेमकांत गायकवाड चोपडा
चोपडा : आज चोपडा गटशिक्षणाधिकारी डॉ.भावना भोसले यांना मा.रविंद्र वाडे यांच्या नेतृत्वाखाली मा.सुधाकर गजरे सो.(अधिक्षक शालेय पोषण आहार चोपडा),मा.सुमित्र अहिरे(शिक्षण विस्तार अधिकारी चोपडा),मा.पारसमणी मोरे(वरिष्ठ लिपिक चोपडा),मा.सुभाष वारडे सर(मुख्याध्यापक चोपडा),मा.चेतन तायडे(कर्मचारी सर्व शिक्षा अभियान),मा.एस.आर.पाटील सर(माध्य.शिक्षक हिंगोणे),मा.गोपाळ कोळी (शिक्षक वराड),गेमा बालेला(राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद),प्रमोद कोळी(शिक्षक),प्रमोद पाटील(मुख्याध्यापक मोरचिडा)यांनी निवेदन देऊन कालीफित लाऊन कार्यालयीन कामकाज केले.
आंदोलन व निवेदन का दिले
,भारत सरकारने बहुजनांच्या हितार्थ असणारे संविधानातील २९ कायदे रद्द केले.,
नवीन बनविलेले कामगार कायदे कामगारांच्या हिताचे नाहीत.,
शेतक-यांच्या विरोधात ३ कायदे पारित केले.,
बहुजन कर्मचाऱ्यांच्या संविधानामुळे पद्दोन्नतीचा अधिकार असुनही पद्दोन्नतीत अडथळे निर्माण करणे.,
संविधानामुळे मिळालेले निवृत्तीवेतन योजना बंद करणे.,
भारत सरकारद्वारा सरकारी उद्योग व कंपन्यांचे खाजगीकरण करुन बहुजन समाजाला रोजगारापासुन वंचित करणे.
या सरकारी निती विरोधात राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघ या बहुजनांच्या ट्रेड युनियन मार्फत भारतातील ५५० जिल्हे,४००० तालुके येथील तहसिलदार व जिल्हाधिकारी तसेच विविध खात्यांच्या खाते प्रमुखांना आज चोपडा तालुक्यात काळी फीत बांधुन निवेदन देत निवेदन देण्यात आले.
बहुजन राजा जागा हो….
व्यवस्था परिवर्तनाचा धागा हो.






