Akkalkot

प्रियदर्शनी मंगलकार्यालय त्वरीत चालू करा अन्यथा रासप, रिपाई, प्रहारच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा

प्रियदर्शनी मंगलकार्यालय त्वरीत चालू करा अन्यथा रासप, रिपाई, प्रहारच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा

अक्कलकोट प्रतिनिधी कृष्णा यादव

अक्कलकोट नगरपरिषदेच्या वतीने बांधण्यात आलेल्या एवन चौकातील प्रियदर्शनी मंगलकार्यालयाचे काम गेल्या दिड ते दोन वर्षांपासून चालू आहे. सदर कामाचे मुदत सहा महिन्याचे असताना मुदत संपून देखील संबंधित ठेकेदार यांनी काम आजतागायत पुर्ण केलेले नाही,त्यामुळे अक्कलकोट नगरपरिषदचे लाखो रुपयांचे नुकसान होत असुन ते त्वरित चालू करावे या मागणीसाठी राष्ट्रीय समाज पक्षाचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष सुनील बंडगर आणि रिपाइंचे अक्कलकोट तालुका अध्यक्ष अविनाश मडीखांबे तसेच प्रहार जनशक्ती पक्षाचे शहर अध्यक्ष अमर शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली नगरपरिषदचे वरिष्ठ क्लार्क मलिक बागवान यांना निवेदन देण्यात आले. यावेळी वंचित आघाडीचे तालुका अध्यक्ष चंद्रशेखर मडीखांबे, अंबादास गायकवाड,रवी सलगरे, सुरेश गायकवाड,शुभम मडिखांबे,राहुल मोरे,सोमनाथ घोडके आदी उपस्थित होते. सर्व सामान्य जनतेला कमी दरामध्ये उपलब्ध असणारे मंगलकार्यालय म्हणून प्रियदर्शनी मंगलकार्यालयाकडे प्रथम प्राधान्य असते तरी या मंगल कार्यालयाचे काम पूर्ण न झाल्याने अक्कलकोट शहरातील खाजगी मंगल कार्यालयाचे दर अव्वाच्या सव्वाच्या झाल्याने सर्व सामान्याचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. म्हणून मा. मुख्याधिकाऱ्यांनी त्वरीत चौकशी करून संबंधित ठेकेदारावर वेळेच्या मुदतीत पुर्ण न केल्याने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी आणि त्यांचे नाव ब्लॅकलिस्ट मध्ये टाकण्यात यावे अशी आमच्या पक्षाची मागणी आहे. सोमवार दिनांक 2 मार्च रोजी राष्ट्रीय समाज पक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट, प्रहार जनशक्ती पक्ष यांच्या वतीने प्रियदर्शनी मंगलकार्यालयासमोर गाढवाचे लग्न लावून अनोखे आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रीय समाज पक्षाचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष सुनील बंडगर, रिपाइंचे तालुका अध्यक्ष अविनाश मडीखांबे आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे शहराध्यक्ष अमर शिरसाट यांनी दिला आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button