Jalgaon

? Big Breaking…जळगांव येथिल प्रांताधिकारी दिपमाला चौरे आणि लिपिक अतुल सानप ACB च्या ताब्यात..

जळगांव येथिल प्रांताधिकारी दिपमाला चौरे आणि लिपिक अतुल सानप ACB च्या ताब्यात..

जळगांव येथीलव प्रांताधिकारी दीपमाला चौरे यांचेसह एकाला वाळू व्यावसाईकाचे जप्त केलेले वाहन सोडविण्यासाठी सव्वा लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी रंगेहात पकडले.

सविस्तर माहिती अशी की एका वाळू व्यवसायीकाकडे बुलढाणा येथील पावत्या असताना देखील महसूल विभागाच्या पथकाने एमआयडीसी भागात दोन वाहने पकडले होते. ही वाहने सोडविण्यासाठी प्रांताधिकारी चौरे यांनी २ लाख रुपये लाचेची मागणी केली होती. परंतु ताडजोडीनन्तर सव्वा लाख रुपये प्रांत यांना देण्याचे ठरले होते. ही रक्कम प्रांत दीपमाला चौरे व त्यांच्याच कार्यालयातील लिपिक अतुल सानप यांनी त्यांच्या पंटर मार्फत स्वीकारल्यानंतर लाचलुचपत विभागाच्या पथकाने दोघांना अटक केली आहे.

लाचेची मागणी-2,00,000/-₹ तडजोडीअंती 1,25,000/-₹
लाच स्विकारली- 1,25,000/₹ हस्तगत रक्कम- 1,25,000/-रु लाचेची मागणी ता.20/08/2020 ला करण्यात आली असून लाच ता. 21/08/2020 रोजी स्वीकारली आहे.

तक्रारदार यांचा वाळु वाहतुकीचा व्यवसाय असुन त्यांच्याकडे गौण खनिजकर्म अधिकारी बुलढाणा यांचेकडील परवाना असतांना सदर वाळु वाहतुक करणाऱ्या दोन ट्रक जळगावच्या तहसिल पथकाने एमआयडीसी परीसरात पकडून सदर ट्रक एमआयडीसी पोलीस स्टेशनला उभे केलेत, सदर ट्रक सोडण्याच्या मोबदल्यात आरोपी क्रं.1 यांच्यावतीने त्यांच्या समक्ष आरोपी क्रं.2 यांनी दि.20/08/2020 रोजी तक्रारदार यांचेकडे पंचासमक्ष 2,00,000/-रूपये लाचेची मागणी करुन तडजोडीअंती 1,25,000/-रुपये लाचेची मागणी केली. सदर लाचेची रक्कम आरोपी क्रं.2 यांच्या खाजगी पंटरने स्वीकारली. सदर कारवाई जिल्हाधिकारी कार्यालय,जळगाव परीसरात करण्यात आली.

या घटनेचे हॅश व्हॅल्यू घेण्यात आली असून फोटोग्राफ घेण्यात आले आहेत.
या यशस्वी सापळा पथकात PI. संजोग बच्छाव, पोहेकॉ.अशोक अहीरे, पोना.मनोज जोशी,पोना.सुनिल शिरसाठ, पोकॉ.प्रविण पाटील, पोकॉ.नासिर देशमुख, पोकॉ.ईश्वर धनगर इ नी कार्य केले ते तपास अधिकारी संजोग बच्छाव, पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि.जळगांव हे आहेत. मा.श्री. सुनील कडासने सो, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक, मा.श्री. निलेश सोनवणे सो, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक,मा.जी.एम.ठाकुर, पोलीस उप अधिक्षक, ला.प्र.वि.जळगांव.यांच्या मार्गदर्शनाखाली सदर सापळा यशस्वी करण्यात आला.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button