Pandharpur

कोविड रुग्णालयासाठी आ भारत नाना भालके यांनी दिला ३० लाखांचा निधी

कोविड रुग्णालयासाठी आ भारत नाना भालके यांनी दिला ३० लाखांचा निधी प्रतिनिधी रफीक आत्तारपंढरपूर जून महिन्याच्या अखेरीस शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे, या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आ भारत भालके यांनी ३०लाख रुपयांचा निधी मंजूर करून घेतला आहे सध्या शहार् व तालुक्यातील परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे,४०० च्या वर कोरोना रुग्णाची संख्या वाढत आहे, यामुळे आ भालके यांनी पंढरपूर येथे सर्व शासकीय अधिकाऱ्याची आढावा बैठक घेऊन, तात्काळ ऑक्सिजन मशीन खरेदी करण्यासाठी३०लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील,उप विभागीय पोलीस अधीक्षक डॉ सागर कवडे,प्रांताधिकारी सचिन ढोले,वैद्यकीय अधिकारी डॉ एकनाथ बोधले, उप जिल्हा रुग्णालय प्रमुख डॉ जयश्री ढवळे, न पा मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, गट विकास अधिकारी रविकिरण घोडके, पो नि प्रशांत भस्मे,अरुण पवार,किरण अवचर उपस्थित होते, यावेळी अनेक महत्त्वाच्या निर्णयावर विचारविनिमय करण्यात आला, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याशी चर्चा करून आ भालके यांनी रॅपिड किट सह इतर अत्यावश्यक आरोग्य साहित्य मंजूर करून घेतले आहे,तसेच गंभीर रुग्णासाठी अत्यावश्यक ऑक्सिजन मशीन खरेदी करण्यासाठी निधी उपलब्ध केला आहे.कोरोना ची साखळी तोडण्यासाठी पुन्हा लॉक डाउन केला जाण्याची शक्यता आहे, याबाबत शुक्रवारी निर्णय घेण्यात येईल, गोरगरिबांसाठी असणारे उप जिल्हा रुग्णालयात कोरोनाचे उपचार सुरू ठेवावेत,ते बंद करू नयेत असे आ भालके म्हणाले,तसेच कोरोना रुग्णावर उपचार करण्यासाठी आणखी६ खाजगी हॉस्पिटल्स ताब्यात घेण्यात येणार आहेत, सध्या सोलापूर जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येत पंढरपूर तालुका धोकादायक तिसऱ्या क्रमांकावर आहे, सध्या सोशल डिस्टनसिंग व इतर बाबींचा फज्जा उडाला आहे,नागरिक या महामारीचा गांभीर्याने विचार करीत नाहीत,सोशल मिडियावर येणाऱ्या उलटसुलट माहिती मुळे जन माणसात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे, या सर्व बाबींचा विचार करून या आढावा बैठकीत आ भालके यांनी जनहितासाठी महत्वाचे निर्णय घेतले आहेत.कोविड रुग्णालयासाठी आ भारत नाना भालके यांनी दिला ३० लाखांचा निधी

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button