Pandharpur

फॅबटेक पब्लिक स्कूलमध्ये माझी वसुंधरा अभियान संपन्न

फॅबटेक पब्लिक स्कूलमध्ये माझी वसुंधरा अभियान संपन्न

प्रतिनिधी
रफिक आतार

फॅबटेक एज्युकेशन सोसायटी पुणे संचलित फॅबटेक पब्लिक स्कूल अॅन्ड जुनियर कॉलेज मध्ये माझी वसुंधरा अभियानाची शपथ घेतली शालेय विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाबरोबरच पर्यावरण व वातावरणीय बदल बाबत जागृकता निर्माण व्हावी म्हणून महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरण बदल विभागामार्फत राज्यभरात माझी वसुंधरा व स्वच्छ सर्वेक्षण अभियान राबवले जात आहे. अभियानामध्ये पृथ्वी, जल, वायू, अग्नी, आकाश या तत्वावर आधारित असून पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन करणे हा मुख्य उद्देश आहे. शिक्षण म्हणजे केवळ शालेय अभ्यासक्रम नसून त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जबाबदार नागरिक घडविणे याला अधिक महत्त्व दिले आहे. वातावरणीय बदल हा आता जागतिक समस्या बनले आहे. त्यावर मात करण्यासाठी शासन विविध मार्गांनी प्रयत्न करीत आहे. ही समस्या रोखण्यासाठी पर्यावरण पूरक सवयी अंगीकारणे गरजेचे आहे. म्हणून शाळेमध्ये सर्व विद्यार्थ्यांना व शिक्षकांना ही शपथ दिली आहे. माझी वसुंधरा अभियानात कृतीयुक्त सहभाग नोंदवावा असे वचनही घेतले. विद्यार्थ्यांना माझी वसुंधरा स्वच्छ व सुंदर करण्यासाठीची शपथ शाळेच्या शिक्षिका सौ शितल बिडवे यांनी दिली. शाळेचे प्राचार्य श्री पाटील यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरण रक्षण व संरक्षण याबद्दल मार्गदर्शन केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button