Jalgaon

जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी राबविलेल्या ‘बेड साईड असिस्टंट’ पॅटर्नची मुख्यमंत्र्यांकडून दखल!

जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी राबविलेल्या ‘बेड साईड असिस्टंट’ पॅटर्नची मुख्यमंत्र्यांकडून दखल!

रजनीकांत पाटील

जळगाव :> जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी राबविलेल्या ‘बेड साईड असिस्टंट’ पॅटर्नची मुख्यमंत्र्यांनी दखल घेत कौतुक केले आहे. सोबतच सर्व विभागाच्या यंत्रणेने रात्रंदिवस घेतलेल्या मेहनतीमुळे जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्ण संख्येत दिवसेंदिवस घट होत आहे, मृत्यूदरही खाली येत आहे.

जिल्ह्यास प्राप्त झालेल्या विविध निधीच्या माध्यमातून आरोग्य यंत्रणेने अत्याधुनिक सुविधा उभारण्यावर भर दिल्याने मुंबईच्या रुग्णालयांबरोबरीच्या सुविधा जळगावला मिळत आहे. सामाजीक संघटनांनी केलेल्या सहकार्य व अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेमुळे हे शक्य झाले आहे. यापुढील काळातही सामाजिक संस्थांनी आपले योगदान द्यावे असे आवाहनही त्यांनी केले.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासन सज्ज असून आता जिल्ह्यात अगदी दर २५ किमीवर ऑक्सीजन बेडची सुविधा उपलब्ध होत असल्याचे सांगत आगामी नवरात्रोत्सव व दिवाळीत काळजी घ्या, नियम पाळा. असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button