Bhusawal

सखी श्रावणी महिला बहुउद्देशिय संस्था भुसावळ यांचे वतीने मांडवा दिगर येथे आदिवासी भिल्ल वस्तीत मोफत उबदार कपडे वाटप

सखी श्रावणी महिला बहुउद्देशिय संस्था भुसावळ यांचे वतीने मांडवा दिगर येथे आदिवासी भिल्ल वस्तीत मोफत उबदार कपडे वाटप

राहुल खरात

सखी श्रावणी महिला बहुउद्देशिय संस्था भुसावळ यांचे वतीने मांडवा दिगर येथे आदिवासी भिल्ल वस्तीत राहणार्या बांधवांना मोफत ब्लॕकेट्स, ऊबदार कपडे, व अन्नदान , वाटप ! भुसावळ ; प्रतिनिधी / कार्यक्रम महंत शिवानंदभारती महाराज यांच्या भोलेशंकर भारती या आश्रमात पार पडला, या वेळी प्रमुख उपस्थिति महंत शिवानंदभारती महाराज व भारत स्वाभिमान पतंजलि जिल्हा प्रमुख भवरलालजी जैन यांची होती,यावेळी सर्वांना शिक्षण हे अतिशय महत्वाचे आहे, साक्षर झाल्या शिवाय आपण प्रगति करु शकणार नाही, शिक्षणा बरोबरच आपण स्वच्छता हि ठेवणी तेवढीच गरजे ची आहे, आपण ही स्वच्छ राहणे खुप गरजे चे आहे मुलांना शाळेत पाठवणे, त्यांना शिक्षण देणे हे पालकांचे प्रथम कर्तव्य आहे, असे मार्गदर्शन संस्थेच्या संस्थापिका सौ राजश्री नेवे यांनी केले, श्री, भवरलालजी प्रजापति यांनी ऐक्युप्रेशर तपासणी केले, काही आजारांवर त्यांनी निदान केले, महंत शिवानंद भारती महाराज यांनी मुलांना व पालकांना स्वच्छता, शिक्षण व संस्कार, मोठ्यांविषयी आदर व नम्रता यावर आपले मार्गदर्शन केले, यावेळी उपस्थित लाभार्थिंनी सुध्दा आपल्या काही समस्या मांडल्या सकस आहार नाही मिळत, बेरोजगारी आहे, हाताला काही काम नाही त्यामुळे बेरोजगारी आहे, निवारा नाही, कुठपर्यंत आम्ही असेच जंगलात राहणार, आम्ही ही मनुष्य आहोत, आम्हालाही त्रास होतो, असे विविध समस्या मांडल्या, नंतर सर्व वस्तुंचे वाटप करण्यात आले, व अन्नदान सुध्दा करण्यात आले, यात ३०० जणांनी अन्नदानाचा लाभ घेतला, यावेळी उपस्थित संस्थेचे पदाधिकारी व सभासद माया चौधरी, वंदना झांबरे, अनुराधा टाक, पुष्पा अग्रवाल, दिपा पाटिल, रेखा जोशी, मंदाकिनी केदारे, स्मिता माहुरकर, महानंदा पाटील, संगिता लुल्ला,तेजस्विनी प्रजापति, या उपस्थित होते, गणेश राठोड व विघ्नहर्ता पब्लिकेशन्सचे रविंद्र निमाणी यांच सहकार्य लाभले

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button