Pandharpur

पंढरपूर शहरातील वृतपत्र विक्रेत्यांना मनसेेचा मदतीचा हात

पंढरपूर शहरातील वृतपत्र विक्रेत्यांना मनसेेचा मदतीचा हात

प्रतिनिधी रफिक आतार

पंढरपूर शहरातील परिस्थिती पाहून कोरोनामुळे वृत्तपत्र व्यवसाय संकटात आला आहे. त्याचबरोबर वृत्तपत्र व्यवसायाच्या साखळीतील अत्यंत महत्वाचा दुवा असलेल्या वृत्रपत्र विक्रेत्यांवरही त्याचा परिणाम झाला आहे. दररोज पहाटे नियमीतपणे प्रत्येकाच्या घरी वृर्तमानपत्र पोच करुन एक प्रकारे सेवा करणार्या पंढरपूर शहरातील वृतपत्र विक्रेत्यांना मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांनी धान्यासह जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. पत्रकार अनिरुध्द बडवे यांच्या हस्ते मदतीचे वाटप केले. कोरोनामुळे देशभरात लाॅक जाहीर करण्यात आले आहे.

यामुळे वृत्तपत्र व्यवसायावर देखील मोठे संकट ओढवले आहे. अशा कठिण परिस्थितीत देखील वृत्तपत्र विक्रेत्यांच्या सकारात्मक भूमिकेमुळे वृत्तपत्र सुरु आहेत.
संकट काळात देखील पंढरपुरातील अनेक विक्रेते घरोघरी जावून लोकांना वृत्तपत्र वाटप करण्याचे काम करत आहेत.

अशा जिगरबाज वृत्तपत्र विक्रेेत्यांना मदत म्हणून मनसेेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांनी गहू, तांदुळ,साखर, चहा पावडर आदींसह सॅनिटायझर व मास्कचे वाटप करण्यात आले.यावेळी वृत्तपत्र संघटनेचे अध्यक्ष श्री.भिलारे, मनसेचे तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील, शहर अध्यक्ष सिध्देश्वर गरड, उपाध्यक्ष मगेश पवार,सागर घोडके,अर्जून जाघव, संजय रणदिवे, जेम्स फिलिप्स आदी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button