बचतगट महिलाचे संपूर्ण कर्ज माफीसाठी लातूर मध्ये मनसेचा विराट मोर्चा
प्रतिनिधी प्रशांत नेटके
कोरोनाच्या या महामारीत बचतगट हप्ते भरणे आता अश्यक्य झाले आहे. त्यामुळे हे कर्ज माफ करून मिळावे या मागणीसाठी मनसेने च्या वतीने लातूर येथे सोमवार दि 12 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे महिलाचा मोर्चा काढण्यात आला. यामध्ये लातूर शहर आणि परिसरातील सर्व महिला आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .
महिलांनी बचत गट कर्ज घेताना आपल्या कर्जातून विमा रक्कम काढून घेतली जात असते. तो विमा हा संकट आल्यावर लागू केला जातो, परंतु विमा रक्कम काढून घेऊन त्याचे सर्टिफिकेट मिळाले नाही त्यामुळे या कोरोनाच्या परिस्थितीत विमा लागू करणे अश्यक्य झाले आहे. व्यवसाय बुडाले साहित्याची नासाडी झाली यामुळे महिलांना आता नव्याने व्यवसाय करणे अवघड झाले आहे. तरी सरकारने यामध्ये योग्य मार्ग काढून अडचणीत आलेल्या महिलांना दिलासा देऊन नवीन कर्ज उपलब्ध करून देन्यासाठी पाठपुरावा करावा अशी मागणीही मनसेचे प्रदेशाध्यक्ष दिलीप बापू धोत्रे यांनी मागणी सरकारकडे केली महिला बचत गटाचे संपूर्ण कर्ज माफ करण्यासाठी लातूरचे जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांना मनसेच्या वतीने निवेदन देण्यात आले हे कर्ज लवकरात लवकर माफ व्हावे महाराष्ट्र नवनिर्माण सेना लातूरच्या वतीने शेतकरी सेना अध्यक्ष संतोष नागरगोजे प्रदेश सरचिटणीस तथा सहकार सेना प्रदेश अध्यक्ष दिलीप धोत्रे यांच्या नेतृत्वाखाली महिला बचत गटाचे संपूर्ण कर्ज माफ करण्यात यावे यासाठी प्रचंड गर्दीत महिला मोर्चा काढण्यात आला यावेळी जिल्हाध्यक्ष डॉक्टर नरशिह भिकाने भागवत शिंदे किरण चव्हाण फुलचंद कावळे असंच महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.






