पंढरपुरातील अशा सेविका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना मनसेची मदत
प्रतिनिधी रफिक आतार
पंढरपूर शहरामधील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सध्या आशा सेविका आणि पंढरपूर नगरपालिकेचे आरोग्य कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून जनसेवा म्हणून काम करत आहेत. कोरोना योध्दे म्हणून त्यांचे हे काम निश्चितच गौरवास्पद आहे. लोकांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या आशा सेविका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना मनसेेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांनी आज अन्नधान्यासह जीवनावश्यक वस्तू देवून त्यांच्या प्रती कृतज्ञा व्यक्त केली.
नगरपालिका रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डाॅ.बजरंग धोत्रे,नगरसेवक विक्रम शिरसट व डाॅ.जगताप यांच्या हस्ते शहरातील सर्व आशा सेविका आणि आरोग्य कमर्चाऱ्यांना मदतीचे वाटप केले. कोरोना आणि लाॅकडाऊनच्या काळात मनसेचे सरचिटणीस दिलीप धोत्रे यांनी गोरगरीब लोकांना मदत करुन सामाजिक कर्तव्य पार पाडले आहे. त्यांचे हे काम समाजासाठी गौरवास्पद असल्याची भावना डाॅ.बजरंग धोत्रे यांनी यावेळी व्यक्त केली.
मनसेच्या वतीने गेल्या तीन महिन्यांपासून लाॅकडाऊनेने अडचणीत आलेल्या शहर व तालुक्यातील अनेक गावातील गरीब व गरजू कुटुंबांना अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करुन त्यांना आधार दिला आहे.त्यांच्या या उपक्रमाचे राज्यभरात कौतुक झाले आहे. सर्व स्तरातील घटकांना मदत केल्यानंतर आज त्यांनी स्वतःहून आरोग्य कर्मचारी आणि आशा सेविकांच्या प्रती कृतज्ञा म्हणून त्यांनी आज अन्नधान्यासह जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. यावेळी आशा सेविका व आरोग्य कर्मचार्यांना गहू,तांदुळ,साखर,तेल,पोहे, आदीसह जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.यावेळी मनसेचे तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील, शहर अध्यक्ष सिध्देश्वर गरड,उपप्रमुख महेश पवार, सागर घोडके,समाधान डुबल आदी उपस्थित होते.






