करकब येथे कोरोना बंदोबस्तासाठी असणाऱ्या होमगार्ड आणि कमांडो फोर्स च्या जवांनाना मनसेचे अन्नदान
प्रतिनिधी रफिक आतार
पंढरपूर, तालुक्यातील लाॅकडाऊन काळात लोकांच्या सुरक्षेसाठी रात्रंदिवस काम करणाऱ्या होमगार्ड आणि खासगी कंमाडो यांना गेल्या महिन्याभरापासून दररोज दोन वेळा मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांनी अन्नदानसेवा केली आहे. त्यांनी तालुका आणि शहरात केलेल्या अन्नदानामुळे अनेक गोरगरीब लोकांची भूक भागवली आहे.
देशात आणि राज्यात कोरोनाचे संकट आले आहे. अशा परिस्थितीत सुमारे दोन महिन्यांपासून लाॅकडाऊन आहे. लाॅकडाऊन काळात लोकांची सुरक्षा करण्यासाठी पोलिसाबरोबर होमगार्ड आणि महाराष्ट्र कंमाडो फोर्सचे अधिकारी कर्मचारी आपल्या जाीवाची बाजी लावून रात्रंदिवस देशसेवेच्या कामात व्यस्त आहेत.
रस्त्यावर उभे राहून काम करणाऱ्या करकंब (ता.पंढरपूर) पोलिस ठाण्याचे होमगार्ड आणि महाराष्ट्र कंमाडो फोर्सच्या जवांनासाठी मनसेेचे प्रदेश सरचिटणीस दिलीपबापू धोत्रे गेल्या महिन्याभरापासून त्यांच्या हाॅटेलमध्ये दररोज अन्नदान योजना सुरु केली आहे.
दररोज दोन वेळा जेवणाची व्यवस्था केली होती. त्यांचा हा अन्नदानाच्या उपक्रमामुळे अनेकांची भूक भागली आहे. श्री. धोत्रे हे मागील दोन महिन्यांपासून कोरोना विरोधी लढ्यात सक्रीय सहभागी झाले आहेत. त्यांनी तालुक्यातील व शहरातील हजारो लोकांना अन्नधान्य वाटप करुन गोरगरीबांना आधार दिला आहे. त्यांनी सुरु केलेल्या अन्नदान आणि धान्य वाटप उपक्रमाचे जिल्हाभरात कौतुक केले जात आहे.या उपक्रमासाठी मनसेचे तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील,शहर अध्यक्ष सिध्देश्वर गरड,सहकार सेनेचे जिल्हा अध्यक्ष कृष्णा मासाळ उपाध्यक्ष महेश पवार,सागर घोडके,महेंद्र पवार, संजय गायकवाड,किरण वंजारी, समाधान डुबल आदी परिश्रम घेत आहेत.






