Maharashtra

बाणगाव येथे अखंड हरीनाम संकीर्तन समारोप समारंभ युवा नेते मंगेशदादा चव्हाण यांची उपस्थिती

बाणगाव येथे अखंड हरीनाम संकीर्तन समारोप समारंभ
युवा नेते मंगेशदादा चव्हाण यांची उपस्थिती

बाणगाव येथे अखंड हरीनाम संकीर्तन समारोप समारंभ युवा नेते मंगेशदादा चव्हाण यांची उपस्थिती

चाळीसगांव प्रतिनिधी नितीन माळे
महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. या मातीतून भारताला अध्यात्माची परंपरा दिली गेली. श्री.विठ्ठल हे सर्व कामकरी- कष्टकरी समाजाचे आराध्य दैवत. माझे आई-वडील हे वारकरी असल्यामुळे मला लहानपणापासूनच वारीची गोडी लागली. माझ्या घरात अध्यात्माचे-वारकरी संप्रदायाचे संस्कार आहेत. त्यामुळे कुठल्याही प्रकारचा वाईट शोक किंवा व्यसन मला लागले नाही. कारण माझ्यावर माझ्या आई-वडिलांचे व संतांचे संस्कार होते. याच भावनेतून मी यावर्षी तब्बल 2200 लोकांना पंढरीची वारी घडवून आणली. प्रामाणिकपणे समाजाला काही देता येईल यासाठी माझे सामाजिक उपक्रम चालू असतात.तालुका दुष्काळमुक्त करण्यासाठी श्री विठ्ठलाच्या चरणी पंढरपूर येथे साकडे घातले आहे. भविष्यात तालुका दुष्काळमुक्त करण्यासाठी माझे सर्व प्रयत्न असतील, असे मनोगत बानगाव येथे सुरू असलेल्या अखंड हरिनाम संकिर्तन सप्ताहाच्या समारोपाप्रसंगी युवा नेते मंगेश दादा चव्हाण यांनी व्यक्त केले.
गेल्या सात  दिवसापासून हा अध्यात्मिक प्रबोधनाचा कार्यक्रम बानगाव याठिकाणी सुरू होता. त्याचा समारोप युवानेते मंगेश चव्हाण यांच्या माध्यमातून झाला.
या समारोप कार्यक्रमाप्रसंगी माजी सरपंच शिवलाल शेलार सर, माजी पं.स.सदस्य सतिष पाटे, अनिल नागरे, प्रभाकर चौधरी, दत्तूआबा पाटील, भजनी मंडळ अध्यक्ष बारकू तात्या पाटील, ग्रा.स. मिनाताई शेलार, ग्रा.स.पांडुरंग पवार, राजू पवार, तंटामुक्त अध्यक्ष लालाआप्पा परदेशी, पहिलवान छोटू परदेशी, समाधान शेलार, विशाल पाटील, तुषार चव्हाण, मनोज गोसावी, विकी राजपूत, राज पाटील यांची उपस्थिती होती. 
#मंगेशदादा_समर्थक 
#Mangesh_Chavan_Mitra_Parivar
#मंगेश_चव्हाण – विकासाचा वारकरी जनतेचा सेवेकरी 
#Youth_Icon_Mangesh_Chavan

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button