चांपा/नागपूर

सरपंचाच्या सहकार्याने पहिल्यांदाच प्रधानमंत्री आवास योजनेतून सुकळी गावात पाच घरकुल मंजुर

सरपंचाच्या सहकार्याने पहिल्यांदाच प्रधानमंत्री आवास योजनेतून सुकळी गावात पाच घरकुल मंजुर

सरपंचाच्या सहकार्याने पहिल्यांदाच प्रधानमंत्री आवास योजनेतून सुकळी गावात पाच घरकुल मंजुर

चांपा प्रतिनिधी अनिल पवार
:प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत  सुकळी गावात पहिल्यांदाच गरजूंना पाच घरकुल मंजुरीचे पत्र  वाटप आज करण्यात आले .
   
अनुसूचित जाती /जमातीतील लोकांना पहिल्यांदाच  प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेचा मंजुरीपत्र  वाटपाचा कार्यक्रम ग्रामपंचायत कार्यलयाकडून करण्यात आला. सरपंच अतिश पवार यांच्या सहकार्याने सोमवारी या योजनेचा शुभारंभ चांपा ग्रामपंचायतील सुकळी या गावातून करण्यात आला.
आर्थिक निकष आधारावर सुकळी गावातील  पाच  लाभार्थ्यांची निवड करून प्रत्येकी लाभार्थ्यांना घरकुल मंजुरीचे  पत्र सरपंच अतिश पवार यांच्या हस्ते देण्यात आले. ही घर योजना एकूण दोन लाख पन्नास हजार रुपयांची असून तिन टप्प्याटप्प्याने रक्कम देण्यात येणार आहे. सरपंच अतिश पवार  यांच्या विशेष प्रयत्नांना यश येऊन गरिब गरजवंत लाभार्थ्यांना घराचे स्वप्न पूर्ण होण्यास मदत झाली आहे. यावेळी उपसरपंच अर्चना सिरसाम , ग्रामपंचायत सदस्य अस्मिता अरतपायरे ,  मिराबाई मसराम , इत्यादी  गावातील सामाजिक कार्यकर्ते  उपस्थित होते.
 प्रधानमंत्री आवास योजनेतून पहिल्यांदाच सुकळी गावात 
पाच घरकुल मंजुर करण्यात आले. असून चांपा येथील  सरपंच अतिश पवार यांच्या सहकार्याने मला ग्रामपंचायतर्फे घरकुल दिले आहे त्याबाबत मी खूप आनंदी असून मी सरपंच अतिश पवार यांना धन्यवाद देते.
– सुषमा मडावी लाभार्थी

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button