Pandharpur

ढोर समाजातील गरीब व गरजूंना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मदत

ढोर समाजातील गरीब व गरजूंना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मदत

प्रतिनिधी रफिक आतार

पंढरपूर शहरातील पारंपरिक व्यवसाय करुन आपला उदरनिर्वाह करनाऱ्या ढोर समाजातील गरीब व गरजू लोकांना आज मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांच्या वतीने अन्नधान्यासह जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.येथील वीरशैव कक्कय्या ढोर समाज मठात गरजूंना नगरसेवक अंबादास धोत्रे यांच्या हस्ते मदतीचे वाटप करण्यात आले. पंढरपूर शहरात विविध समाज आणि जातीचे लोक मोठ्या संख्येने राहातात. आपला पारंपारिक उद्योग व्यवसाय करुन चरितार्थ चावला जातो. परंतु कोरोनामुळे अनेक छोटे मोठे व्यवसाय बंद झाले आहेत. केवळ छोट्या व्यवसायावर गुजरान करणारी अनेक कुटुंब संकटात सापडली आहेत.उपजिवेकीची साधनच संपल्याने अनेकांवर उपासमारीची देखील वेळ आली आहे. पारंपारिक व्यवसाय करुन कुटुंबाची भूक भागविणार्या ढोर सामाजातील अनेक कुटुंब अडचणीत आली आहेत.अशा कुटुंबांना माणूसकीच्या नात्याने मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांच्या वतीने गहू, तांदुळे, साखऱ यासह इतर जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. गेल्या 48 दिवसांपासून श्री. धोत्रे यांनी शहर व तालुक्यातील सर्वच समाजातील गरीब व गरजू लोकांना मदत देवून त्यांना आधार देण्याचा प्रयत्न केला आहे.
त्यांनी केलेल्या मदतीमुळे अनेकांच्या लहान मुलांच्या पोटात सुखाचा घास भरवला आहे. आईच्या रुपाने आम्हा गरीबांना दिलीप धोत्रे यांनी मदत केल्याची भावना आज मातृदिनाच्या निमित्ताने अनेक लोकांनी व्यक्त करुन त्यांचेही आभार मानले.
यावेळी मनसेचे तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील, शहर अध्यक्ष सिध्देश्वर गरड,उपप्रमुख महेश पवार, सागर घोडके, अनिल खंदारे,संदीप शिंदे,सुदर्शन शिंदे, विनोद खंदारे, महालिंग शेरखाने आदी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button