Pandharpur

रमजान ईद घरीच साधेपणाने साजरी करावी

रमजान ईद घरीच साधेपणाने साजरी करावी
जुबेर हमीद बागवान

प्रतिनिधी रफिक आतार

कोरोना विषाणु साथिच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र काळजीचे वातावरण असल्याने सामाजिक संवेदना आणि कर्तव्याचा भाग म्हणुन रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे, असे आवाहन खिदमत चॅरिटेबल ट्रस्ट चे संस्थापक अध्यक्ष
जुबेर हमीद बागवान यानी केले आहे.चंद्र दर्शनानुसार पंढरपुरासह सर्वत्र २४ किंवा २५ तारखेला ईद साजरी करण्यात येण्याची शक्यता आहे.रोज्यांमध्ये सुर्योदयापुर्वि खाणे(सहेरी)अपेक्षित आहे,तर सुर्योदयानंतर जेवन(इफ्तार) करण्याची परवानगी आहे. रमजानच्या पवित्र महिन्यात केलेले सर्व रोजे ईदच्या दिवशी सोडले जातात. दर वर्षी सगे सोयरे, मित्र परिवार, शेजार्यांसमवेत मोठ्या उत्साहात साजरी केली जाणारी ईद यावर्षी साधेपणाने साजरी करावी.कारण सध्याच्या परिस्थितीमध्ये संपूर्ण जगभरामध्ये तसेच आपल्या भारत देशात महाराष्ट्रात कोरोना संसर्गाने हैदोस घातलेला आहे हा कोरोना रोग संसर्गाने वाढत असल्यामुळे शासनाने दिलेले नियमांचे व सुचनांचे पालन करत तसेच आपल्या तोंडाला मास्क किंवा रुमाल लावून जेणेकरून या कोरोनासंसर्गाचा फैलाव होणार नाही याची काळजी आपण सर्व मुस्लिम बांधवांनी घेणे अत्यंत गरजेचे आहे. सामाजिक भान राखत साधेपणाने ईद साजरी करावी. सर्वांच्या दिर्घायुष्यासाठी दुआ प्रार्थना करावी, असे आवाहन खिदमत चॅरिटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष
जुबेर हमीद बागवान यानी केले आहे.
रमजान महिन्याच्या काळात मशिदींमध्ये सामूहिक नमाज पठण न करता घरीच नमाज पठण करुन देशातील मुस्लिम बांधवांनी जे जबाबदारीचे पालन केले आहे तसेच शिस्तिचे पालन ईदच्या दिवशी करावे,असे आवाहन जुबेर हमीद बागवान यांनी मुस्लिम बांधवांना केले आहे.खिदमत चॅरिटेबल ट्रस्ट पंढरपुर तर्फे सोशल मीडीया व व्रुत्तपत्राच्या माध्यमातून तमाम हिंदु मुस्लिम बांधवांना रमजान ईद सणाच्या शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button