मुक्ताईनगर प्रतिनिधी सुमित बोदडे
आज दिनांक 18/09 /2019 रोजी मुक्ताईनगर येथील शासकीय विश्रामगृहात वंचित बहुजन आघाडीची बैठक काल नव नियुक्ती झालेले जिल्हा अध्यक्ष मा. राजेंद्र भाऊ सांगळकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. तसेच या बैठकीत रावेर लोकसभा मतदार संघाच्या नव नियुक्त जिल्हा कमिटी व तालुका कार्यकारिणी जाहीर करून जिल्हा कमिटी व तालुका कमिटी मधील पदाधिकारी व कार्यकर्ते यांची परस्परांशी ओळख परिचय करून येत्या विधानसभा निवडणुकीत मा बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार व मा. दशरथ जी भांडे साहेबांच्या मार्गदर्शनात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून पक्ष्याची भूमिका वंचित बहुजन लोकांपर्यंत पोहचवणे या बद्दल मार्गदर्शन करून विधानसभा निवडणुकीत मोठ्या ताकदीने प्रस्थापितांना लढत देण्याचा निर्धार करण्यात आला. यावेळी जिल्हा संघटक मा. शमीभा ताई, ज्येष्ठ नेते मा. गवई साहेब, मा. राजेंद्र भाऊ सांगाळकर, कौस्तुभ शिंदे, जिल्हा अध्यक्ष सम्यक विद्यार्थी आंदोलन, मा. महेश तायडे महासचिव , यांनी मार्गदर्शन केले. यावेळी सर्व जिल्ह्यातील व तालुक्यातील नव नियुक्त तालुका अध्यक्ष मा. सुमीत चव्हाण जामनेर, ह भ प चिकटे महाराज मुक्ताईनगर, मनोहर कोळी रावेर.संतोष कोळी भुसावळ व इतर तालुका अध्यक्ष, कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.व लवकर सर्व तालुक्यामधे बैठकी घेण्यात येतील असे जिल्हा अध्यक्ष यांनी सांगितले
सूत्र संचालन सुमित बोदडे यांनी केले …







