Bollywood

Bollywood:अखेर 17 वर्षानंतर गौरीने सोडली शाहरुख खान ची साथ..!जाणार “त्याच्या” कडे..!

Bollywood:अखेर 17 वर्षानंतर गौरीने सोडली शाहरुख खान ची साथ..!जाणार “त्याच्या” कडे..!

Bollywood: बॉलिवूडचा किंग खान (King Khan) म्हणजेच अभिनेता शाहरुख खान आणि त्याची पत्नी गौरी खान यांची जोडी ही बॉलिवूडमधील लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. गौरी ही एक प्रोड्युसर आणि इंटेरिअर डिझायनर आहे. तिच्या कामामुळे गौरी बऱ्याचवेळा चर्चेत असते. शाहरुखसोबत गौरी अनेक बॉलिवूड पार्ट्यांमध्ये दिसते. पण यावेळी गौरी शाहरुखलासोडून बॉलिवूडमध्ये नेहमी चर्चेचा विषय ठरणाऱ्या करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या शोमध्ये हजेरी लावणार आहे. गौरी करणच्या या टॉक शोमध्ये तब्बल 17 वर्षांनी हजेरी लावणार आहे.

‘कॉफी विथ करण’ चं हे 7 वं पर्व सुरु आहे. या शोमध्ये सेलिब्रिटी त्यांच्या खासगी आयुष्यातील अनेक गोष्टींचा खुलासा करत आहेत. आता गौरी शोमध्ये हजेरी लावणार म्हटल्यानंतर आर्यन ड्रग्स प्रकरणात ती काही बोलू शकते असे अनेकांचे म्हणणे आहे. या शिवाय तिची लेक सुहाना खानदेखील शोमध्ये डेब्यू करणार अशा देखील चर्चा सुरु आहेत. गौरी करणच्या या टॉक शोमध्ये तब्बल 17 वर्षांनी हजेरी लावणार असून तिनं या आधी 2005 मध्ये हजेरी लावली होती. यावेळी गौरीसोबत ऋतिक रोशनची पूर्वाश्रमीची पत्नी सुझान खाननं हजेरी लावली होती.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button