Kolhapur

आखाडा विधानसभेचा मी येतोय के.पी.तुमचा फॉर्म भरायला…मा.शरदचंद्र पवारसाहेबांचा थेट के.पी. शी संवाद…

आखाडा विधानसभेचा
मी येतोय के.पी.तुमचा फॉर्म भरायला.मा.शरदचंद्र पवारसाहेबांचा थेट के.पी. शी संवाद.

आखाडा विधानसभेचा मी येतोय के.पी.तुमचा फॉर्म भरायला...मा.शरदचंद्र पवारसाहेबांचा थेट के.पी. शी संवाद...
कोल्हापुर प्रतिनिधि अनिल पाटील
वेळ दुपारची .. मा.आमदार के.पी.साहेब कार्यकर्त्याच्या गराड्यात चर्चेत व्यस्त असताना मुंबईच्या एनसीपी कार्यालयातून फोन खणानला.अन् दस्तुरखुद्द देशाचे नेते राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आदरणीय शरदचंद्र पवारसाहेब बोलू लागले.. के.पी. मी शुक्रवार ४ ऑक्टों २०१९ ला येतोय मुदाळला…तुझा फॉर्म भरायला व प्रचार शुभारंभ कार्यक्रमाला…मा.आमदार के.पी. पाटील यांच्या तीस पस्तीस वर्षाच्या निष्ठेला मिळालेले फळ तर सिद्ध झालं पण के.पी.साहेब इतकं भावनाविवषही झाले की निष्ठेच्या फळाने, भावनाने डोळ्याच्या कड़ा ओल्याचिंब झाल्या.
या मतदारसंघातून पाचवेळा विधानसभा लढवून पराभव वगळता दोनवेळा विक्रमी मताधिक्याने निवडून आले.ते फक्त शरदपवार साहेबांची विचारधारा.. अन् तत्वनिब्ठा … बरंच काही सांगून जाते. मा.आम.के.पी.पाटील यांच्यासाररव्या सामान्य भुमीपुत्राच्या प्रचारशुभारंभासाठी व फॉर्म भरायला देशाचा आयडॉल मुदाळच्या मातीत पाय रोवतो याच आश्चर्य वाटल नाही तर नवल…काय हाय हा आपलेपणा फक्त आणि फक्त के.पी.साहेबांची निष्ठा अन् समाजकारणातल्यात् विचारांची रेलचेल… के.पी. म्हटलं की समृद्ध सहकार मग तो साखर कारखाना असो वा सुतगिरण असो कसं चालवतो याचा अभ्यास पवारसाहेबांनी अनेक वर्षे जाणाला आहेच.
शुक्रवार दि.४ ऑक्टो २०१९ ला मुदाळमध्ये साहेब येताहेत हया बातमीची हवा जोर धरुन नव्हे तर वातावरणच बदललयं.विरोधी गटात हवालदिलता पसरली असून भुतकाळातल्या विकासांना उजाळा देत आपला के.पी च बरा म्हणत पवारसाहेबाच्या पदस्पर्शाने के.पी.च्या मताधिक्यात वाढ होणार असल्याची चर्चा होताना दिसते..

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button