उस्मानाबाद

शैक्षणिक परीक्षेत काॅपी करणं व त्यासाठी प्रोत्साहित करणं ही विकृती—कुलगुरू डाॅ.प्रमोद येवले

शैक्षणिक
परीक्षेत काॅपी करणं व त्यासाठी प्रोत्साहित करणं ही विकृती—कुलगुरू डाॅ.प्रमोद येवले

शैक्षणिक परीक्षेत काॅपी करणं व त्यासाठी प्रोत्साहित करणं ही विकृती—कुलगुरू डाॅ.प्रमोद येवले

उस्मानाबाद प्रतिनिधी राजा जगताप
विद्यापीठाच्या पदव्या घेत असतांना विद्यार्थ्यांनी अभ्यास करूनच घ्याव्यात व गुणवत्तेबरोबरच नोकरी मिळवून देणारी कौशल्ये विकासत करून सन्मानाने विद्यार्थ्यांनी बाहेर पडावे असे असले तरी विद्यापीठाला काॅपीमुक्त परीक्षा अभियान राबवावे लागते आहे.आज सर्वञच काॅपी करणारया विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढले आहे याला केवळ विद्यार्थ्याला दोष देऊन चालणार नाही तर त्याला संस्थाचालक,शिक्षक ,पालकही जबाबदार आहेत काॅपी करणं व त्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करणं ही विकृती असल्याचे प्रतिपादन डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू मा.डाॅ.प्रमोद येवले यांनी आज दि.३आॅक्टोंबर रोजी रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात “काॅपीमुक्त अभियानेचे”उदघाटन करतेवेळी केले आहे.अध्यक्षस्थानी मा.नानासाहेब पाटील माजी नगराध्यक्ष ,उस्मानाबाद हे होते.मंचावर प्राचार्य डाॅ.जयसिंगराव देशमुख,प्रा.डाॅ.कैलास पाथ्रीकर(संचालक बहि:शाल मंडळ डाॅ.बा.आं.म. विद्यापीठ),प्रा.डाॅ.देविदास इंगळे उपस्थित होते.प्रारंभी प्रमुख पाहुणे व मान्यवर यांनी शिक्षणमहर्षी डाॅ.बापूजी साळुंखे व संस्थामाता सुशिलादेवी साळींखे,श्री.स्वामी विवेकानंद यांचे प्रतिमाचे पूजन केले.या प्रसंगी मा.कुलगुरू डाॅ.प्रमोद येवले हे महाविद्यालयात पहिल्यांदाच आल्याने प्राचार्य डाॅ.जयसिंगराव देशमुख यांनी त्यांचा संस्थेच्या व महाविद्यालयाचे वतीने सत्कार केला.
पुढे बोलतांना कुलगुरू डाॅ.येवले म्हणाले की,आज विद्यापीठात कांही समस्या असल्या तरी वातावरण आता बदलले आहे.पुढच्या काळातील परीक्षांचे निकाल लवकर लावले जातील .संशोधनाकडे लक्ष दिले जाईल आज पदव्या घेणा—यांच्या फौजा बाहेर पडत आहेत बेरोजगारी वाढत आहे.यासाठी मी,औरंगाबाद परिसर व इतर ठिकानच्या इंडस्ट्रीयल कंपन्याशी चर्चा करत आहे विद्यापीठ व कंपन्या यांच्या माध्यमातून रोजगार निर्माण करण्याचे नियोजन केले आहे.आपले रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाचा लौकिक शिक्षण क्षेञात आहे.आपल्या संस्थेचे शिक्षणमहर्षी डाॅ.बापूजी साळुंखेंचे बहुजन समाजाला शिक्षण देण्यात योगदान आहे.आपण आपल्या विद्यार्थ्यांना केवळ शिक्षणच देत नाहित तर त्यांना संस्कार ही देता हे इतरञ दिसत नाही.आपल्या परीक्षा पारदर्शक होतात म्हणूनच आदर्श परीक्षा केंद्राचा पुरस्कार आपणास तीन वेळा मिळाला आहे .या महाविद्यालयातील प्राध्यापकांनी काॅपीमुक्त चळवल इतरञही राबवावी असे त्यांनी आवाहन करतांनाच विद्यार्थ्यांनी काॅपीमुक्त बनावे सांगितले.
प्रास्ताविक करतांना परीक्षा विभाग प्रमुख डाॅ.देविदास इंगळे म्हणाले की,आमच्या शिक्षणमहर्षी डाॅ.बापूजींनी आम्हाला संस्कार दिल्याने येथील विद्यार्थी काॅपीपासून दूर राहातो म्हणूनच विद्यापीठाचा तीनदा आदर्श परीक्षा केंद्राचा पुरस्कार मिळाला आहे.
प्राचार्य डाॅ.जयसिंगराव देशमुख म्हणाले की या महाविद्यालयाकडे संस्था,व विद्यापीठ चांगल्या नजरेतून पाहातात येथील विद्यार्थ्यांच्यावर डाॅ.बापूजींचे संस्कार आहेत. आज ४०६ शाखा आहेत.दहा हजार कर्मचारी काम करताहेत यावेळी त्यांनी श्री.स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेची स्थापना व इतिहास कथन केला.
यावेळी मा.कुलगुरू डाॅ.प्रमोद येवले यांचा सत्कार डाॅ.बापूजी साळुंखे लाॅ.काॅलेजचे प्र.प्राचार्य कोठारे व काॅलेज आॅफ एज्युकेशनच्या प्राचार्या डाॅ.सुलभा देशमुख यांनी ही सत्कार केला.
यावेळी शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.सूञसंचालन डाॅ.केशव क्षीरसागर यांनी केले आभार प्रा.संदिप देशमुख यांनी मानले.

Leave a Reply

Back to top button