Yawal

दिव्यांग सेना यावल यांच्या मार्फत पंचायत समिती यावल जि.जळगाव यांना निवेदन

दिव्यांग सेना यावल यांच्या मार्फत पंचायत समिती यावल जि.जळगाव यांना निवेदन

सलीम पिंजारी

मा.अक्षय महाजन सर दिव्यांग सेना जळगाव जिल्हा अध्यक्ष यांच्या मार्गदर्शना खाली.यावल तालुका ग्रामपंचायत हद्दीतील सर्व दिव्यांग बांधवाना दिव्यांग कल्याणकारी 5% निधी चे वाटप करण्यात यावे तसेच विना अट घरकुल,बचत गटांना अर्थ साहाय्य, दिव्यांग बांधवाना ग्रामपंचायत द्वारे अंत्योदय रेशन कार्ड, 50 % घरपट्टी व नळपट्टी सूट, प्रत्येक ग्रामपंचायतने दिव्यांग बांधवाचा सर्वे करावा,दिव्यांग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ देण्यात यावा, तसेच सर्व शासकीय योजनेचा लाभ मिळावा असे निवेदन *मा.श्री निलेश पाटील गट विकास अधिकारी सो यावल* यांना देण्यातआले.व त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. दिव्यांग बांधवांचे कामे लवकरात लवकर केले जातील असे आश्वासन दिले.

निवेदन देते वेळेस श्री नाना मोची यावल तालुका अध्यक्ष.श्री भिकन वसाने यावल तालुका उपाध्यक्ष.श्री राहुल कोल्हे यावल तालुका सचिव.श्री नितीन महाजन फैजपूर शहर अध्यक्ष.श्री योगेश चौधरी फैजपूर शहर सचिव.श्री अशोकभाऊ कोळी न्हावी शहर अध्यक्ष, बोरखेडा अध्यक्ष सलिम तडवी.धीरज मोतीवाले न्हावी शहर कार्याध्यक्ष .मोहन पाटील न्हावी शहर संपर्क प्रमुख.मारूळ शहर अध्यक्ष हसन तडवी उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button