Pandharpur

वनविभाग अधिकार्‍याची मोठी कारवाई

वनविभाग अधिकार्‍याची मोठी कारवाई

रफिक अत्तार पंढरपूर

पंढरपूर : मौजे मारापुर येथील चंदन वृक्षतोड प्रकरणी २ आरोपी यांचेविरुद्ध वनगुन्हा नोंदवून त्यांना चंदन मुद्देमालासह न्यायालयात हजर करण्यात आले होते, मा.न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली असता मा.न्यायालयास विनंती करून आरोपींना ३ दिवसांचा FCR घेतला होता. त्यानंतर आरोपींना २ फेब्रुवारी पर्यंत MCR देण्यात आलेला आहे. सदर प्रकरण न्यायप्रविष्ठ केले आहे.या प्रकरणी मालकी क्षेत्रात ३ व फॉरेस्ट क्षेत्रात फक्त ४ चंदन वृक्ष तोडण्याचे क्रॉस चेकिंग मध्ये आढळून आले आहे. मा. सहाय्यक वनसंरक्षक(ACF) साहेब सोलापूर व मी स्वतः स्पॉट व्हिजिट केली व तपासणी केली आहे. मौजे मारापुर परिसरातील मालकी क्षेत्रातून अवैध कोळसा व लाकडाने भरलेला अवैध वाहतूक करणारा ट्रॅकर जप्त करून पंढरपूर येथे आणला आहे. पुढील तपास व कारवाई चालू आहे. सदरची कारवाई माननीय उपवन संरक्षक सोलापूर श्रीधर येशील पाटील आणि सहाय्यक वनसंरक्षक श्री डी जी हाके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली त्यामध्ये श्री व्ही एन पवळे वनपरिक्षेत्र अधिकारी पंढरपूर सौ सुनिता पत्की धनपाल पंढरपुर श्री एस टी धिगे वनरक्षक करकंब श्री भागवत मासाळ वनमजूर श्री दशरथ बुरूंगुले वनपाल बुरूंगुले वनरक्षक माळी श्री रमेश माने व ग्रामस्थ यांनी सहभाग नोंदवला

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button