Pandharpur

महेश साठे यांचा कडून शिवभाजीपाला हा अनोखा उपक्रम . छत्रपती बहुउद्देशीय संस्थेचे सर्वत्र कौतुक

महेश साठे यांचा कडून शिवभाजीपाला हा अनोखा उपक्रम .
छत्रपती बहुउद्देशीय संस्थेचे सर्वत्र कौतुक

रफिक आतार

पंढरपूर :

महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या शिवभोजन थाळीच्या प्रेरणेने प्रेरित होऊन ‘शिवभाजीपाला योजना’ पंढरपूर शहरातील उपनगर असलेल्या टाकळीमध्ये सुरू आहे. येथील उद्योजक आणि शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख महेश साठे यांनी शिवभाजीपाला हा अनोखा उपक्रम सुरू केला असून त्या माध्यमातून दररोज ५ हजार किलो भाजीपाल्याचे घरोघरी वाटप होत आहे.

दि. २३ एप्रिल रोज़ी पांडुरंग सहकारी कारखान्याचे व्हा.चेअरमन वसंतराव देशमुख साहेब, माजी उपसभापती अरुण घोलप, उपसभापती प्रशांत देशमुख या प्रमुख पाहुण्याच्या हस्ते वितरण करण्यात आले.यावेळी
विठाई कन्स्ट्रक्शनचे संजय साठे माजी ए,एस,आय पोलीस अधिकारी भारत जाधव , सरपंच नूतन रसाले डॉ उद्धव रसाले ग्रामपंचायत सदस्य सुमन पवार,माने ,विष्णु सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपति बहूद्देशिय सामाजिक संस्थेचे सदस्य रमेश डुबल फ़िरोज़ तंबोळी ,सोहेल अत्तार सुदर्शन पवार ,दत्ता शेटे, नागेश कुंभार, अमजद इनामदार,रोहित मोहोळकर,योगेश गायकवाड़,स्वप्निल जाधव,सागर कनसे,प्रवीण मोरे,कृष्णा गवळी,सुमित जाधव,सूरज जाधव,अक्षय माने,विनायक वरपे,तात्या घाड़गे,महेश गुरसले,अतुल शितोळे, सज्जन व्यवहारे, सज्जन अवघाड़े, ओंकार वरपे, अरविंद कांबळे, शुभम माने,सज्जन काबंळे,भैय्या सोनवणे.यांच्या सहकार्याने मोफ़त घरपोच सेवा केली जात आहे..

टाकळीमध्ये साधारण २५ हजार लोकवस्ती आहे आणि ८०० घरे आहेत. या ८०० घरांपैकी ९०० ते १,००० घरांना दररोज भाजीपाल्याचे वाटप करण्यात येत आहे. शिवभाजीपाला या योजनेअंतर्गत श्री. साठे यांनी त्यांच्या छत्रपती बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून प्रत्येक घराला पाच किलो भाजी देण्याचा संकल्प सोडला. दररोज सुमारे चार ते पाच किलो भाजीचे १,००० पॅकेट तयार केले जातात आणि ते येथील घरांमध्ये घरपोच केले जातात. गेल्या सात दिवसांपासून हा उपक्रम सुरू असून आतापर्यंत तब्बल ३५ हजार किलो भाजीपाल्यांचे वितरण करण्यात आले आहे. ३ तारखेपर्यंत हा उपक्रम सुरूच ठेवणार असल्याचे साठे यांनी सांगितले. जर ३ तारखेनंतरही लॉकडाऊन उठला नाही तरीदेखील येथील नागरिकांना आणि ग्रामस्थांना ही सेवा अविरत देण्याची आपली तयारी असल्याचेही त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, मंत्री एकनाथ शिंदे, तसेच खा. राजन विचारे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारा मी एक सामान्य शिवसैनिक असून विश्वनाथ नेरूरकर यांच्या मार्गदर्शनाने या शिवभाजीपाला योजनेचा प्रारंभ केला आहे.

तिघांची अडचण आणि निकड !

शेतकरी अडचणीत आहे. त्याच्या मालाला ग्राहक मिळाला पाहिजे, तसेच मार्केटमध्ये नागरिकांनी गर्दी केली तर पोलिसांना त्रास होत आहे. म्हणून पोलिसांची अडचण आणि नागरिक बाहेर गेले तर त्यांना दंडुक्यांचा प्रसाद मिळतो म्हणून त्यांचीही अडचण! या तिघांच्या अडचणीवर मार्ग म्हणून आणि त्यांची निकड म्हणून ही योजना सुरू केली. यामुळे शेतकर्‍यांचा दररोज ५ हजार किलो भाजीला ग्राहक मिळतात. लोकांना बाहेर न येता घरपोच भाजी मिळते आणि पोलिसांचाही त्रास वाचतो, असे महेश साठे यांनी सांगितले

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button