Yawatmal

देवेंद्र जोशी यांचा उत्कृष्ट कवी म्हणून गौरवपत्र देऊन सन्मान

देवेंद्र जोशी यांचा उत्कृष्ट कवी म्हणून गौरवपत्र देऊन सन्मान

रूस्तम शेख यवतमाळ प्रतिनिधी

यवतमाळ जिल्हयात कळंब येथे जिल्हा परिषद बांधकाम विभागात कार्यरत असलेले शाखा अभियंता कवि देवेंद्र जोशी यांना सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला .

शेगाव येथे प्रसिद्ध हास्य कवि नितीन वरणकार यांच्या वाढदिवस निमीत्य कवी विचार मंच यांच्या द्वारा राज्यस्तरीय ऑनलाइन हास्य काव्या स्पर्धा आयोजित करण्यात आली होती . या स्पर्धे मध्ये यांनी सहभाग घेऊन प्राविण्य प्राप्त केल्या बद्दल सर्वोत्कृष्ट कवी म्हणून मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला

या स्पर्धेत परीक्षक म्हणून डॉ राजा धर्माधिकारी यांनी काम पाहिले.
देवेंद्र जोशी यांना सन्मानपत्र मिळाल्याबद्दल प्रशांत सोयाम अभियंता , दै लोकदुत प्रतीनिधी रुस्तम शेख तसेच असंख्य चाहत्यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button