Pandharpur

पंढरपूर येथील जिजामाता शॉपिंग सेंटर मधील व्यापाऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस दिलीपबापू धोत्रे यांच्या उपस्थितीत नगरपालिका मुख्याधिकारी श्री अनिकेत मानोरकार याना निवेदन देऊन चर्चा

पंढरपूर येथील जिजामाता शॉपिंग सेंटर मधील व्यापाऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस दिलीपबापू धोत्रे यांच्या उपस्थितीत नगरपालिका मुख्याधिकारी श्री अनिकेत मानोरकार याना निवेदन देऊन चर्चा

प्रतिनिधी रफीक आत्तार

पंढरपूर येथे अतिवृष्टीमुळे प्रचंड मोठा पूर आला.शहरात पाण्याचा निचरा न झाल्यामुळे सगळीकडे पाणीच पाणी झाले,अनेक लोकांच्या घरात पाणी शिरले, तसेच अनेक दुकानात पाणी साचल्याने व्यापाऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले.
छत्रपती शिवाजी महाराज चौकातील जिजामाता शॉपिंग सेंटर मधील सर्व दुकानात पाणी शिरले त्यामुळे खूप नुकसान झाले आहे. त्या संदर्भात तेथील पाणी त्वरित काढण्यात यावे आणि गाळे धारकांना गळ्याची उंची वाढवण्यास परवानगी द्यावी अशी मागणी करण्यात आली.यावेळी मुख्याधिकारी यांनी त्वरित कारवाई करण्याचे संबंधितांना आदेश दिले.यावेळी उपाध्यक्ष महेश पवार ,नागेश इंगोले, अभिजित डूबल,व्यापारी सचिन घोडके,दिलीप वाघमारे,कुमार जाधव, लियाकत तांबोळी, धोंडीराम माळी, मोहन माळी, गणपत टाकणे, मधुसूदन भट्टड, श्रीकांत राठी इत्यादी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button