पंढरपुरातील गोंधळी समाजातील गरजू बांधवांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मायेची सावली
प्रतिनिधी रफिक आतार
पंढरपूर शहरामध्ये लाॅकडाऊनमुळे सध्या लग्न समारंभ आणि त्या अनुसंगाने केले जाणारे जागरण गोंधळ कार्यक्रम ठप्प झाले आहेत. त्यामुळे अशा विधी आणि कार्यक्रमांवर पोट भरणारे अनेक पारंपारिक लोककलावंतावर उपासमारीची वेळ आली आहे. लग्ना झाल्यानंतर नवरदेवाच्या दारात आईंचा जागरण गोंधळ मांडून नव विवाहित दाम्पत्यांचा संसार सुखाचा व्हावा यासाठी आई तुळजाभावनीकडे मागणं कऱणारे गोंधळी समाजातील अनेक कलावंतावर कोरोनाचे सावट आहे.गेल्या दोन महिन्यांपासून जागरण गोंधळाचे कार्यक्रम बंद झाल्याने येथील गोंधळी समाजातील अनेक तरुण कलाकार अडचणीत आले आहेत. गोंधळी समाजातील गरीब व गरजू कलाकारांना आज मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांनी अन्नधान्यासह जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दोन महिन्यांपासून लाॅकडाऊन आहे. या दरम्यान अनेक कार्यक्रम रद्द झाले आहेत. लग्न समारंभ व त्या अनुसंगाने होणारे जागरण गोंधळ, देवपूजा असे घरगुती कार्यक्रम ही रद्द झाले आहेत.
पारंपारिक जागरण गोॆधळ कार्यक्रमातून समाज प्रबोधन आणि देवीची भक्ती करणारे अनेक कलाकार अडचणीत आले आहेत. या कलाकारांकडे ना शासनाचे ,ना लोकप्रतिनिधीचे लक्ष नाही.त्यामुळे या लोक कलावंतची होणारी परवड सुरु आहे. हीच बाब लक्षात घेवून मनसेेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांनी गरीब व गरजू गोंधळी कलावंतांना गहू, तांदुळ, साखर, यासह जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.यावेळी मनसेचे तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील, शहर अध्यक्ष सिध्देश्वर गरड,दिलीप पाचंगे, उपप्रमुख महेश पवार, अर्जून जाधव,सागर घोडके,कालिदास सोनवणे,दत्तात्रय लोँढे, विकास शिंदे, अंबादास शिंदे, सिकंदर सातपुते, महादेव लोंढे,समाधान डूबल आदी उपस्थित होते.






