महेदविया उर्दू शाळेच्या पटगणांत विद्यार्थ्यांनी विविध खादय पदार्थाचा भरविला बाल बाजार
मुलांना व्यवहारिक ज्ञान समजावे केंद्रप्रमुख बबन गवळे
सुरेश बागडे
परंडा
लहान वयातच मुलांना व्यवहारीक ज्ञान समजावा त्यांचा आत्मविश्वास वाढावा यासाठी असे उपक्रम राबविण्यात येत आहेत असे केंद्रप्रमुख बबन गवळे यांनी महेदविया उर्दु शाळेच्या विद्यार्थीनी भरविलेल्या बाल बाजाराचे उद्घाटन प्रसंगी बोलताना सांगीतले .
शाळेच्या विद्यार्थ्यांनी मोठया संख्येने सहभाग घेऊन विविध खाद्यपदार्थाचे
दुकाने ( स्टॉल ) थाटली होती . या बाजाराला पालकांनी जि.प. केंद्रिय शाळेच्या मुलानी भेट देऊन विविद्य
खाद्यपार्थाची खरेदी करुन त्याचा आस्वाद घेऊन आनंद केला . शाळेच्या विद्यार्थांनी थाटलेल्या दुकानात वडापाव , भाजीपाव , भजी , पाणीपुरी , भेळ , समोसे , गुलाब जामुन , पापड , शिव चिवडा , यासह आदि पदार्थ विक्री करीत ठेवले होते .
पालक विद्यार्थ्यांनी या पदार्थाची खरेदी करून बाल बाजाराचा अनुभव घेतला . तर थाटलेल्या दुकानातुन आलेल्या पैशामुळे विद्यार्थान व्यव्हारिक ज्ञान प्राप्त झाले . बाल बाजारामुळे शाळेच्या पटगणांत झालेल्या कचऱ्याची साफसफाई मुलांनी केली .
या बाल बाजाराला माजी नगरध्यक्षा नसरीन शहाबर्फीवाले .केंद्रप्रमुख बबन गवळे . जि.प. कें.मुख्याद्यापक अंकुश जाधव . इरफान शेख .नसीर शहाबर्फीवाले
. रियाज शेख .सादिक शाहा . मकबुल लांडगे . शाळेच्या मुख्याद्यापिका सय्यद आसीया . शेख सादिक . शेख इलियास . शेख जमीर . हारूण शरीकर हे शिक्षक उपस्थीत होते






