Nashik

येवला तालुक्यात पिकाचे पंचनामे व पाहणी करून नुकसान भरपाई देण्याची -स्वारीप ची मागणी

येवला तालुक्यात पिकाचे पंचनामे व पाहणी करून नुकसान भरपाई देण्याची -स्वारीप ची मागणी

नाशिक शांताराम दुनबळे

नाशिक-:नाशिक जिल्ह्यात व येवला तालुक्‍यात सुरुवातीलाच खरीप हंगामाच्या तोंडावर पाऊस चांगल्याप्रकारे पडल्याने शेतकरी वर्ग मोठ्या आनंदाने मका मुंग सोयाबीन बाजरी या पिकाची लागवड येवला तालुक्यात मोठ्या प्रमाणात झाली तेव्हापासून पाऊस हा काही अंशी उघडझाप व रीप रीप स्वरूपात पडत असताना ऐन मूंग सेंगा, बाजरी व मका कणीस दाणे भरण्याच्या काळात अचानक वाढलेल्या पावसाने उभ्या मका पिकाचे नुकसान होऊन मकाचे पिक आडवे पडून मकाचे पिक भुईसपाट झाल्याचे चित्र तालुक्यात बहुतेक ठिकाणी झालेले आहे त्यामुळे शेतकऱ्यावर मोठे संकट सामोरे ठाकले आहे यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले आहे म्हणून शासनाने तात्काळ पाहणी करून नुकसान भरपाई देण्यासाठी कार्यवाही करावी अशी मागणी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे तालुका सचिव शशिकांत जगताप यांनी पत्रकाद्वारे मागणी केली आहे.

एकीकडे शेतकऱ्याने कर्ज उसनवारी करून पिकाची लागवड केली त्यात शेतकऱ्याचे आज रोजी नुकसान झालेले आहे तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिसकावून घेण्याचा अट्टहास झाला
तसेच लॉकडाउनच्या टप्प्या टप्प्यात शेतकऱ्याचा मालं कवडीमोल विकला त्यातही शेतकरी हतबल होऊन आर्थिक संकटाशी व कोरोना शी सामना करत असताना मुंग पिकाच्या शेंगा झाडावरच काळा पडूनमोड येऊन खराब झाल्या त्यापाठोपाठ मका पिकाचे कणसे खाली पडल्याने आलेले पीक हातातून गेल्याशिवाय राहणार नाहीम्हणून शासनाने तात्काळ पंचनामे व पाहणी करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष तालुका सचिव शशिकांत जगताप यांनी केली आहे.

मका पिकाचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांच्या जनावरांना चारा मिळणे मुश्कील होणार आहे त्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा साठी शेतकऱ्याला धावपळ व कसरत करावी लागणार आहे ज्या शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान पावसाने झाले आहे तसेच ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला आहे त्या शेतकऱ्यांना विमा कंपनीने व शासनाने तात्काळ पीक पाहणी व पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी स्वाभिमानी पक्षाचे जगताप शशिकांत सह , विजय घोडराव, महेंद्र पगारे नवनाथ पगारे आकाश घोडेराव यांनी पत्रकाद्वारे केली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button