Latur

लातुरचे सुपुत्र विनोदवीर बालाजी सुळ करीत आहेत भारुडातून कोरोना जनजागृती

लातुरचे सुपुत्र विनोदवीर बालाजी सुळ करीत आहेत भारुडातून कोरोना जनजागृती

दयानंद शिक्षण संस्थेचा उपक्रम

लातुर प्रतिनिधी:-प्रशांत नेटके

ठोस प्रहार वृत्तसेवा:-
जगभरात कोरोना या महाभयंकर आजाराने थैमान घातले असून दिवसेंदिवस रुग्णसंख्या ही वाढतच आहे.प्रशासनाच्या वतीने कोरोना संसर्ग रोखण्यासाठी योग्य नियोजन व आवश्यक असे प्रयत्न केले जात आहेत.
अशातच कोरोना विषयी जनजागृती व्हावी याकरिता लातूर जिल्ह्यातील दयानंद शिक्षण संस्था संचलित दयानंद कला महाविद्यालयाच्या वतीने कॉमेडीवीर, हास्य कलावंत,व स्टार प्रवाह मराठी वाहिनीवरील ‘एक टप्पा आउट’ विजेते बालाजी सुळ,ज्योतिबा बडे व शरीफ पठाण हे कलावंत भारुडाच्या माध्यमातून कोरोना विषयी जनजागृती करत आहेत.

कोरोना पासून कशा प्रकारे संरक्षण करावे , डॉक्टर नर्स व पोलीस बांधवांशी सौजन्याने वागावे असा महत्वपूर्ण संदेश त्यांनी विनोदी शैलीतून दिला आहे.

या भारुडातून प्रबोधनाची संकल्पना दयानंद कला महाविद्यालयाचे प्रमुख प्रा.शिवाजी गायकवाड यांची आहे.तर डॉ देवेंद्र कुलकर्णी व डॉ संदीप जगदाळे यांनी कलावंतांना मार्गदर्शन केले आहे.
या भारुडासाठी हार्मोनियम साथ प्रा.शरद पाडे,ढोलकी साथ सूरज साबळे,बँजो साथ वाल्मिक बनसोडे, ऑक्टोपॅड साथ उमेश टेकाळे यांनी तर ध्वनिमुद्रण प्रीतम मुळे व चित्रीकरण साईकेदार बोधनकर यांनी केले आहे.

या स्तुत्य उपक्रमाबद्दल दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमन लाहोटी,सरचिटणीस रमेश बियाणी,संयुक्त सचिव सुरेश जैन ,उपप्राचार्य अनिलकुमार माळी,पर्यवेक्षक डॉ दिलीप नागरगोजे,नवनाथ भालेराव यांनी कौतुक केले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button