लायन्स क्लब पंढरपूर च्या पदाधिकारी निवड संपन्न लायन्स क्लब ऑफ पंढरपूर नूतन अध्यक्ष — नगरसेवक विवेक परदेशी
रफिक आतार पंढरपूर
पंढरपूर : लायन्स क्लब ऑफ पंढरपूर ची २०२१-२२ ची पदाधिकारी व कार्यकारिणी निवड नुकतीच संपन्न झाली. मावळत्या अध्यक्षा ला.डॉ. सुजाता गुंडेवार यांनी ही निवड जाहीर केली.अध्यक्षपदी पंढरपूर नगरपालिकेचे नगरसेवक मा.ला.विवेक परदेशी यांची एकमताने निवड करण्यात आली. तसेच सचिव पदी अनुभवी व कार्यतत्पर अशा ला.ललिता कोळवले जाधव यांची तर खजिनदार पदी पंढरपुरातील प्रसिद्ध मनोविकारतज्ञ ला.डॉ.ऋजुता गोळवलकर उत्पात व प्रथम उपाध्यक्ष म्हणून ला.डॉ.मृणाल गांधी यांची निवड करण्यात आली. नागरिकांमधील खरी गरज शोधुन ती पूर्ण करण्याचे काम लायन्स क्लब इंटरनॅशनल या सामाजिक संस्थे व्दारा करण्यात येते.लायन्स संस्था गेली कित्येक वर्षे सामाजिक मदतकार्य करत आहे. पंढरपूर मध्ये लायन्स क्लब संचलित शहीद मेजर कुणालगिर गोसावी अंध शाळा, लायन्स क्लब पंढरपूर संचलित नेत्र रुग्णालय तसेच अंधांसाठी पोस्टल ब्रेल लायब्ररी असे कायमस्वरूपी प्रकल्प लायन्स संस्था राबवत आहे. सामाजिक कार्याची आवड मुळतः नुतर सदस्यांना आहे.लायन्स क्लब पंढरपूरच्या कार्यात खूप मोलाची भर पडणार आहे तसेच नुतन सदस्य सदर वर्षामध्ये सामाजीक कार्यामध्ये आपला ठसा उमटवतील तसेच लायन्स संस्थेचा सेवेचा वारसा नुतन सदस्य निभावतील असा विश्वास सर्व लायन्स सदस्यांनी सदर प्रसंगी व्यक्त केला. पंढरपुरातील नागरिक व विशेष पदाधिकारी यांनी तसेच लायन्स संस्थेचे डिस्ट्रिक्ट तसेच मल्टिपल पदाधिकारऱ्यानी नूतन सदस्यांचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या आहेत.
धन्यवाद
लायन्स संस्था पंढरपूर सचिव
ला.ललिता कोळवले-जाधव.
7588185771.






