Chopda

१०० खाटाचे महिला रूग्णालय सिव्हील हॉस्पीटलकडे हस्तांतरीत

१०० खाटाचे महिला रूग्णालय सिव्हील हॉस्पीटलकडे हस्तांतरीत

हेमकांत गायकवाड चोपडा

चोपडा : रोडवर उभारण्यात आलेले भव्य महिलांसाठीचे रूग्णालय आज सार्वजनीक खात्याकडून सिव्हील हॉस्पीटलकडे हस्तांतरीत करण्यात आले असून येथेच कोविड केअर सेंटर सुरू होणार आहे.

याबाबत वृत्त असे की, तत्कालीन सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे मोहाडी रोडवर फक्त महिलांसाठीचे उत्तर महाराष्ट्रातील एकमेव असे महिलांसाठीचे सुपर स्पेशालिटी रूग्णालय उभारण्यात आले आहे. तब्बल ८० हजार चौरस फुटाच्या जागेवर अतिशय प्रशस्त आणि हवेशीर जागेमध्ये हे रूग्णालय उभारण्यात आले असून आज पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी याची पाहणी केली. याप्रसंगी या रूग्णालयाच्या ए, बी, डी आणि ई विंग असे मिळून एकूण ८० हजार चौरस फुटांचे बांधकाम हे सार्वजनीक बांधकाम खात्याकडून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.

याप्रसंगी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, महापौर सौ. जयश्री महाजन, आयुक्त सतीश कुलकर्णी, सार्वजनीक बांधकाम खात्याचे उपविभागीय अभियंता श्रेणी-१ सुभाष राऊत आणि कंत्राटदार पंकज बिर्ला यांची उपस्थिती होती.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button