लातूरच्या स्वच्छता कामगाराची काळजी घ्या
महापौर यांनी लक्ष द्या
लातूर -लक्ष्मण कांबळे
सध्या संपुर्ण जग भर कोरोना व्हायरस ने सांगलाच धूमाकूळ घातला आहे सामान्य लोकांचं सोडा तर अधिकारी लोक देखिल कोरोना वायर्स पासुन बचाव करण्या साठी आपण आपल्या घराने जणता कर्फ्यु मध्ये सामिल झाले आहेत पण लातूरमध्ये काही भागात स्वच्छता कामगार मात्र आपल्या जिवाची परवा न करता दिवस निघायला लातूर स्वच्छ करण्यासाठी घराबाहेर पडत आहे कोरोना ची कसली ही भिती न बाळगता आप आपल्या कामावर तयार आहेत पण जन आधार संस्था असेल अथवा महानगर पालिका असेल अधिकारी कर्मचारी मात्र यांना दुर्लक्षित करताना दिसत आहे कामगारांना ही परिवार आहे घर दार आहे जिव आहे कोरोना वायरस त्यांना पण होऊ शकतो अशा अधिकारी व कर्मचारी यांच्या निष्काळजीपणामुळे जर एखाद्या कामागारांना काही झाले तर त्याचा जिम्मेदार कोण हातात हॅंडग्लोज नाही तोंडाला मास्क नाही अशा प्रकारे कामगार आपले जिवन जगताना दिसत आहे
जनता कर्फ्यु असताना पण स्व:ताचा विचार न करता तो सामान्य लोकांच्या आरोग्याचा विचार करतो तो म्हणजे स्वच्छता कामगार
त्वरीत लातूर येथील स्वच्छता कामगारांना हॅन्डग्लोज व मास्क देण्यात यावे व कामगारांची दक्षता महानगरपालिकेच्या वतीने घेण्यात यावी अशी विनंती केली आहे






