वाईट व्यसन, दुर्गुणांची होळी
लातुर प्रतिनिधी:-प्रशांत नेटके
ठोस प्रहार वृत्तसेवा:-
निलंगा:
जिवनदीप बहुउद्देशीय शैक्षणिक सेवाभावी संस्था यांनी भिल्ल वस्ती येथे होळी तंबाकुयुक्त पदार्थ, वाईट व्यसने, वाईट सवयी, वाईट दुर्गुण यांचे प्रतिकात्मक दहन करून होळी साजरी केली. व तेथील सर्वांनी व्यसनमुक्त राहण्याची शपथ घेतली. व संकल्प केला.यावेळी संस्थेचे दै पुण्यनगरी पत्रकार गुरुनाथ मोहोळकर, हरिभाऊ टोंपे, शकील शेख, शफीक शेख, निसार तांबोळी, सतीश जाधव, ऋतुजा पंडित,जनाताई सूर्यवंशी मॅडम, पांचाळ ज्योती ,वस्तीमधील मुले, नागरिक उपस्थित होते. गुरुनाथ मोहोळकर यांनी पर्यावरण रक्षण व संवर्धन या विषयावर भाषण केले. व पुढे पर्यावरणाचे रक्षण करणे आवश्यक आहे. तसेच सर्वांनी निर्व्यसनी रहावे असे सांगितले.






