Pandharpur

कासेगाव च्या सुपुत्राने वैद्यकीय क्षेत्रात मिळवली प्रथम श्रेणी…देशमुख घराण्याचा समाजसेवेचा वसा पुढे चालवणार

कासेगाव च्या सुपुत्राने वैद्यकीय क्षेत्रात मिळवली प्रथम श्रेणी…देशमुख घराण्याचा समाजसेवेचा वसा पुढे चालवणार

प्रतिनिधी रफीक आत्तार

पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथे सध्या कॅन्सर सारखा महाभयंकर आजार हा सर्वसामान्य व्यक्तींमध्ये मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. मात्र या आजारावर कशाप्रकारे विजय मिळवावा तसेच जीवघेण्या आजारावर वेळीच योग्य उपचार करून मात करता येते याच विषयावर वैद्यकीय क्षेत्रात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेले कासेगावचे सुपुत्र डॉक्टर हिम्मत सिंह विजय सिंह देशमुख लवकरच आपल्या सेवेत येत आहेत.

पंढरपूर तालुक्यातील कासेगाव म्हणजे पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आणि जिल्हा परिषद सदस्य वसंतराव(नाना) देशमुख यांची ओळख सोलापूर जिल्हाचं नव्हे तर महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्षांचे नेते व शासकीय अधिकारी हे नावाने ओळखतात. आज त्यांचे पुतणे व विजयसिंह दौलतराव देशमुख यांचे चिरंजीव हिंमत सिंह विजयसिंह देशमुख हे भारती विद्यापीठ दंत महाविद्यालय व रुग्णालय सांगली येथुन प्रथम श्रेणी मध्ये उत्तीर्ण झाले असून.ते लवकरच पंढरपूर येथे मुख व दंत रोगाने ग्रस्त असलेल्या रुग्णांना सेवा देण्यासाठी पंढरपूर येथे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून लवकरच हॉस्पिटल सुरू करण्याचा त्यांचा विचार आहे. तसेच तोंडाचा कॅन्सर सारख्या जीव घेण्या आजार कसा थांबवला जाऊ शकतो, तसेच व्यसनं मुक्त मार्गदर्शन केंद्र चालु करणार आहेत.यावेळी कासेगाव येथील सर्व परिसरातील नागरिकांनी त्यांचे स्वागत केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button