फैजपूर शहरातील पत्रकारांतर्फे जळगाव पिपल्स बँक चेअरमनसह संचालक मंडळाचा निषेध
फैजपूर । प्रतिनिधी सलीम पिंजारी
येथील पत्रकारांतर्फे प्रसार माध्यमांची गळचेपी करून खोटे गुन्हे दाखल करणार्या जळगाव पीपल्स बँक चेअरमन, संचालक मंडळ व बँक प्रशासनाचा निषेध करण्यात येऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन आज उपविभागीय कार्यालयातील नायब तहसिलदार रशीद तडवी यांना फैजपूर शहर पत्रकारांतर्फे देण्यात आले. यावेळी बहुसंख्य पत्रकारांची उपस्थिती होती.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, पिपल्स बँकेला आरबीआयने २५ लाखाचा दंड केल्याचे वृत्त दै.बातमीदारमध्ये प्रसिध्द झाले त्यामुळे ठेविदारांनी बँकेतील ठेवी काढण्यात सुरुवात केली. याचा राग येवून बँकेचे चेअरमन, संचालक व बँक प्रशासनाने दै.बातमीदारचे संपादक हेमंत पाटील यांच्या विरुध्द आकसबुध्दीने यापुढे बातम्या छापू नये यासाठी दबाव तंत्राचा वापर करीत त्यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केला. हे एक प्रकारे वृत्तपत्र स्वातंत्र्याची गळचेपी करण्याचा निंदनीय प्रकार असल्याने या प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी पत्रकार संघटना पुढे आल्या असून फैजपूर येथील उपविभागीय कार्यालयातील नायब तहसीलदार रशीद तडवी यांना निवेदन देवून निषेध व्यक्त करण्यात आला.
यावेळी फैजपूर पत्रकार संस्थेचे अध्यक्ष शेख फारूक, नंदकिशोर अग्रवाल, मयूर मेढे, सलीम पिंजारी, राजू तडवी, इदू पिंजारी, मुबारक तडवी, देवेंद्र झोपे, बंटी आंबेकर उपस्थित होते.





