पत्रकार किशोर जाधव यांची औसा कृषी उत्पन्न बाजारसमितीच्या उपसभापती निवड झाल्याबद्दल किल्लारी पत्रकार संघातर्फे सत्कार
प्रशांत नेटके औसा -लातूर
औसा : औसा तालुक्यातील किल्लारी येथील दैनिक सामना चे पत्रकार किशोर जाधव यांची औसा कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासकीय मंडळाच्या उपसभापती पदी निवड करण्यात आली असून निवडीबद्दल त्यांचा किल्लारी पत्रकार संघातर्फे सत्कार करण्यात आला.यावेळी दैनिक लोकमतचे सुर्यकांत बाबळसुरे, दैनिक पुण्यनगरी चे सतीश सरतापे, दैनिक एकमतचे महेश उस्तूरे, दैनिक देशोन्नती चे कलिम शहा, चेअरमन किरण बाबळसुरे,किशोर बाबळसुरे,संजय बाबळसुरे आदी सर्वजण उपस्थित होते.






