Jalgaon

Jalgaon: ६३ व्या पोलीस स्थापना दिनाला, ४४ वर्षीय पोलीस विनोद अहिरे यांनी ६३ किलोमीटर स्केटिंग करून केला विक्रम, सदरचा विक्रम अर्पण केला २६/११ चा हल्ला व कोरोना महामारीत शहीद झालेल्या शहिदांना

६३ व्या पोलीस स्थापना दिनाला, ४४ वर्षीय पोलीस विनोद अहिरे यांनी ६३ किलोमीटर स्केटिंग करून केला विक्रम, सदरचा विक्रम अर्पण केला २६/११ चा हल्ला व कोरोना महामारीत शहीद झालेल्या शहिदांना

२ जानेवारीला महाराष्ट्र पोलीस दलाला ६३ वर्षे पूर्ण झाली २ जानेवारीपासून महाराष्ट्र पोलीस दल पोलीस सप्ताह म्हणून साजरा करीत आहे.
त्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा पोलीस दलातील राष्ट्रीय खेळाडू पो. कॉ. विनोद अहिरे यांनी पोलीस मुख्यालयातील रोड ट्रॅकवर सलग 63 किलोमीटर स्केटिंग करून साजरा केला आहे. अशा अनोख्या पद्धतीने पोलीस स्थापना दिन साजरा करणारे ते महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील पहिले पोलीस ठरले आहेत. सदरचे 63 किलोमीटरचे अंतर त्यांनी दोन तास २६ मिनिटात यशस्वीरित्या त्यांनी पूर्ण केले.

सकाळी साडेआठ वाजता अपर पोलीस अधीक्षक श्री चंद्रकांत गवळी, एनसीसीचे लेफ्टनंट कर्नल श्री पवन कुमार यांनी हिरवी झेंडी दाखवली.

तत्पूर्वी चंद्रकांत गवळी आपल्या मनोगत म्हणाले की, विनोद अहिरे हे खेळाडू तर आहेतच पण त्याचबरोबर खाकी वर्दीतील साहित्यिक, कवी, लेखक आहेत. त्यांची दोन पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. जळगाव जिल्हा पोलीस दलाला त्यांचा अभिमान आहे.
कर्नल पवन कुमार आपल्या मार्गदर्शनात म्हणाले माझ्या आता पावेतोच्या सेवेमध्ये खेळाडू, साहित्यिक, कवी लेखक असा पोलीस मी प्रथमच बघत आहे, विनोद अहिरे हे जळगाव जिल्हा पोलीस दलाची शान आहेत.
सदर प्रसंगी प्रमुखा अतिथी म्हणून डी वाय एस पी श्री डेरे, प्रमोद बराटे, पो. नि. धनवट, पो.नि. संतोष सोनवणे, लेफ्टनंट शिवराज पाटील, आरएसआय पवार , पी एस आय किरण पाठक, जळगाव जिल्हा वकील संघाचे माजी अध्यक्ष एड. दिलीप बोरसे, फारुक शेख, एन एम कॉलेजचे एनसीसी चे विद्यार्थी यासह जळगाव जिल्हा पोलीस दलातील अधिकारी कर्मचारी त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होती

63 किलोमीटर स्केटिंग पूर्ण झाल्यानंतर विनोद अहिरे म्हणाले की हा माझा आजचा विक्रम मी २६/११ च्या हल्ल्यामध्ये शहीद झालेले अधिकारी कर्मचारी तसेच कोरोना महामारी मध्ये शहीद झालेल्या सर्व अधिकारी, पोलीस कर्मचाऱ्यांना अर्पण करीत आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयाज मोसिन यांनी केले, गायक प्रकाश बोरसे यांच्या टीमने मोटिवेशनल गाणे गाऊन कार्यक्रमाचे रंगत वाढवली. पायलटिंग पलाश शिंदे, बजरंग सपकाळे यांनी केली तर कार्यक्रम यशस्वीते साठी दिगंबर महाजन, ज्ञानेश्वर पवार, प्रमोद अहिरे, प्रफुल्ल अहिरे यांनी परिश्रम घेतले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button