Bollywood Stories: चर्चांच्या उधाणा नंतर आता ह्या दिवशी होणार अभिनेत्री परिणिती चोप्रा आणि आप चे खासदार राघव चढ्ढा यांचा साखरपुडा…
बाॅलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. परिणीती चोप्रा ही तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे. खासदार राघव चढ्ढा याला परिणीती ही डेट करत आहे. हे दोघे बऱ्याच वेळा मुंबईमध्ये सोबत स्पाॅट देखील होतात. आता राघव आणि परिणीती यांच्याबद्दल मोठी बातमी पुढे येतंय.
बाॅलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पार्टीचा खासदार राघव चड्ढा हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहेत. अनेकदा हे दोघेसोबत स्पाॅट देखील होतात. यांच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू आहे.
चाहते देखील परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत. मध्यंतरी चर्चा होती की, परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या सुपारीचा कार्यक्रम पार पडलाय.
नुकताच परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या साखरपुड्याची तारीख पुढे आलीये. रिपोर्टनुसार 13 मेला राघव आणि परिणीती यांचा साखरपुडा हा दिल्लीमध्ये पार पडणार आहे.
आम आदमी पार्टीच्या एका नेत्याने काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत परिणीती आणि राघव यांना त्यांच्या पुढच्या आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या होत्या. ही पोस्ट सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाली होती.






