Maharashtra

शेख हुसेन यांनी आपल्या स्वतःच्या खर्चातून115 गरीब कुटुंबाला केले धान्य वाटप

प्रतिनिधी सलमान पठाण

शेख हुसेन यांनी आपल्या स्वतःच्या खर्चातून115 गरीब कुटुंबाला केले धान्य वाटप…

औराद:- कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनचा सर्वाधिक फटका अशा झोपडीत राहणाऱ्या लोकांना बसला आहे. यात कांही लोकं भीक मागून तर कांही मजुरी करून आपली उपजीविका भागवत होते. सद्यस्थितीला पोटासाठी भटकंती करता येत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली असल्याने अशा गोरगरीब गरजू कुटुंबाला मदत करण्याचे काम शेख हुसेन उद्योजक यांनी या झोपडीत राहणाऱ्या गरीब लोकांना गव्हाचे पीठ, तांदूळ, साखर, मसूर डाळ, गोड तेल असं एकूण 25 किलोचीे पिशवी करून 115 कुटुंबांना औराद सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर सूर्यवंशी, औराद ग्रामपंचायत सदस्य बकशू मुल्ला ,यांच्या हस्ते धान्य वाटप करण्यात आले.

औराद येथील रोड लागत असलेले व शिवाजी चौक येथील सैपन बाबा नगर. शर्मा नगर, शिवनगर, मोलमजुरी करून झोपडीत राहून आपली उपजीविका भागवणाऱ्या गरीब भटक्या समाजाचे लोक मोठ्या प्रमाणात औराद शहरात वास्तव्य करून राहतात. जगासह देशात कोरोना या जीवघेण्या व्हायरसने थैमान घातले आहे. या कोरोना व्हायरसचा फैलाव मोठ्या प्रमाणात होऊ नये म्हणून शासनाने लॉकडाउनची घोषणा केली आहे. त्यामुळे हातावर पोट असणाऱ्या या झोपडपट्टीतील लोकांची मोठी हाल होत आहेत. त्यांना जीवनावश्यक वस्तूंची कमतरता भासत असल्याने माणुसकीची भावना हुसेन शेक सोय खर्चातून यांनी सर्व जनतेला विनाकारण घराबाहेर पडू नका तसेच जे गोरगरीब कुटुंब आहेत अशा कुटुंबांना मदत करण्याचे आवाहनही केले होते. यांच्या आवाहनाची दखल घेत निलंगा नगर परिषदेचे बांधकाम सभापती इरफान सय्यद, उद्योजक अंजार अली सय्यद यांनी या झोपडीत राहणाऱ्या गरीब लोकांना धान्य वाटप करण्यात आले,,,

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button