इंदिरा गांधी विद्यालयात “पारंपारीक साडी डे”साजरा
किरण चव्हाण
धरणगाव*-(दि-14) इंदिरा गांधी माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय धरणगाव येथे आज ‘पारंपारिक साडी डे’साजरा करण्यात आला
इंदिरा गांधी कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी आज पारंपारिक पद्धतीने साडी डे साजरा करून महाराष्ट्राच्या संस्कृती चे दर्शन घडविले
सध्या फॅशन च्या युगामध्ये साडी कुठेतरी लुप्त होत चालली आहे त्याची जोपासना व्हावी,संस्कृती टिकून रहावी या उद्देशाने या कार्यक्रमाची आखणी करण्यात आली होती.विविध रंगांच्या मनमोहक व सुंदर साड्या विद्यालयात खास आकर्षण ठरल्यात शाळेचा गणवेश परिधान करून रोज कंटाळलेल्या विद्यार्थीनी आज खूपच आनंदीत झाल्या होत्या एकंदर खेळी मेळी च्या वातावरणात हा उपक्रम पार पडला
मुख्याध्यापिका सौ सुरेखा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा कांता पाटील, प्रा अर्चना गावीत, प्रा स्नेहल जैन यांनी कार्यक्रमाचे सुंदर आयोजन केले होते
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले
या सुंदर उपक्रमाचे कौतुक चेअरमन डी जी पाटील, व सचिव सी के पाटील यांनी केले आहे






