Maharashtra

एक अभूतपूर्व विवाह सोहळा….अमळनेर येथे भरले  छा. भा चे छोटे खानी समविचारी कार्यकर्त्यांचे संमेलन…

अमळनेर येथे भरले छा. भा चे छोटे खानी समविचारी कार्यकर्त्यांचे संमेलन…
निमित्त होते साहिल आणि पूजा यांच्या अनोख्या विवाह समारंभाचे

अमळनेर येथे नुकताच एक आदर्श विवाह सोहळा पार पडला. माजी नगरसेविका भारती गाला आणि कै जगदीश यांचा जेष्ठ सुपुत्र साहिल हा पुजाशी विवाह बंधनात अडकला.त्यांच्या सहजीवनाचा प्रवास अनोख्या पद्धतीने आज सुरू झाला.
हा विवाह सोहळा म्हणाल तर त्याला काही बँड, बाजा ,बारात नसूनही अत्यन्त साध्या पद्धतीने पारंपरिक रितीरिवाज यांना फाटा देत सत्यशोधक पध्दतीने पार पडला.अनेक समविचारी, अनेक क्षेत्रातील मान्यवर या विवाह सोहळ्यास उपस्थित होते.
परंतु जगदीश ची आठवण मात्र सर्वांचाच राडवून गेली.तो असता तर आणखी वेगळा हा समारंभ संपन्न झाला असता.
परंतु, छाभा-सेवा दलाची 1983 ते अलीकडिल बहुतांश लोकांची हजेरी पाहता हे साहिल पुजाचे लग्न की छाभा चे अधिवेशन? अशी शंका यावी असे वातावरण होते,
जगदीश च्या आठवणी.. अश्रू धारा.. अन तरीही साहिल व पूजा यांना भावी वाटचालीस सदिच्छा देण्याची लगबग. नाच, भाषणे व स्वरूची भोजनाची उत्तम सोय..
मज्जा आली, सारे एकत्र आलो, गळा भेटी झाल्या, जुन्या आठवणी ना उजाळा देत एकडूसऱ्याचे क्षेमकुशल विचारले..
जगदीश व भारती गाला यांचा जिवलग म्हणून आम्ही या लग्नात मिरवून घेतले. या वेळी
माझे सोबत गौतम मोरे, संदीप घोरपडे, प्रा अशोक पवार, चेतन सोनार,रवी पांडे, मिलिंद वैद्य,लालचंद नागदेव, चेतन शाह, श्रीराम चौधरी, रवी ज्योती सॉरी जोशी (खरं तर ज्योती योग्य ) सतीश देशमुख, दिलीप चौधरी रावसाहेब पाटील, जितू वाणी, अमोल येवले, सुधाकर देशमुख कल्पना जाधव, हेमा चौधरी, शुभांगी सोनार, मंगला शहा, मीनाक्षी पवार, प्रा शिला पाटील, आशा दाभाडे असे अनेक अनेक कार्यकर्ते हजर होते.
मात्र आपली म्हणजे जे आले नाहीत त्यांची अनुपस्थिती जाणवली..
बाबूलाल चौधरी,अविनाश पाटील, अभय पाटील, प्रतिभा शिंदे (अति उत्साहात सातारा निघून गेलेली) प्रशांत शिंदे (शानू), जयश्री कोरडे, सचिन खंडारे, नंदू हरम, राजू बहाळकर, संजीव पवार, संजय महाजन, नुरा शेख, गोपाळ नेवे, उदय खैरनार,
अन
आपल्या सर्वाची प्रतीक्षा होती, उणीव जाणविली..
एका आदर्श सहजीवन प्रारंभ समारंभास आपणही असता तर आणखी मज्जा आली असती.
भारती जगदीश यांचे 31 डिसें 1990 लग्न लावण्यात मोठी भूमिका बजावणारे धनंजय सोनार
आज आपल्या सर्वांचे वतीने
परिवाराचा प्रतिनिधी म्हणून
भारती जगदिशच्या मुलाचे सहजीवन प्रारंभास हजर होतो याचा गौरव अनुभवत आहे.
सर्वांची आठवण.
भारती-जगदिशचा लहान मुलगा
आयुध व आपले
मित्र संदीप घोरपडे यांचे विशेष आभार !
जे हजर होते ते धन्य झाले,
जे विविध अडचणी मुळे येऊ शकले नाहीत त्यांनी संधी गमावली पण या नंतर अशी संधी लवकरच येणार आहे, ती मात्र सोडू नका. हीच विनंती.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button