पाणिटंचाई निवारण्यासाठी नवनिर्वाचित सरपंच उपसरपंच यांचे हस्ते हातपंप खोदकामचे भुमिपुजन!
कोरपणा : मानवी जिवन जगत असतांना ‘पाणी’ हा घटक मानवाच्या मुलभुत गरजेत मोडतो.”पाणी हेच जिवन आहे” ही बाब सर्वश्रुत आहे.काही दिवसातच उन्हाळ्याची चाहुल लागुण यावेळी पाणिटंचाई निर्माण होणार आहे.
मनोज गोरे कोपरणा
कोपरणा : कोरपणा येथुन जवळच असलेल्या मौजा लोणी येथे नवनिर्वाचित उपसरपंच अविनाश मारोती वाभिटकर यांनी याबाबत गावामध्ये मध्ये आढावा घेतला असता पाणी टंचाई उद्भवण्याची परिस्थीती निदर्शनास आली.त्यांनी याबाबत ग्राम सचिवाचे लक्ष वेधले.ग्राम सचिवांनी कसलाही विलंब न लावता जिल्हा परिषदेकडे पाठपुरावा केला आणी जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने एक हातपंप मंजुर केला.त्याचे खोदकाम सरपंच सौ.रिपीका सुभाष येलपुरवार आणी उपसरपंच श्री.अविनाश मारोती वाभिटकर यांचे हस्ते नुकतेच करण्यात आले.
यावेळी माजी उपसरपंच संजय पिंपळशेंडे,माजी सरपंच वृंदा आत्राम,प्रतिष्टित नागरिक बंडु थेरे,ज्ञानेश्वर आवारी,अमोल वाभिटकर,सतिश मुसळे,विनोद भोंगळे,भारत काकडे,रमेश तोडासे,श्रीकांत नांदेकर,अमोल आवारी,शंकर मामिडवार,बंडु चौधरी,बंडु आत्राम यांचेसह गावातिल बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.






