Pandharpur

आयकर कायद्या संबधी जनजागृती कार्यक्रम संपन्न

आयकर कायद्या संबधी जनजागृती कार्यक्रम संपन्न

आपण जे उत्पन्न मिळवतो त्यावर टॅक्स भरावा लागतो. इन्कम टॅक्स भरण्याच्या प्रक्रियेची योग्य ती माहिती नागरिकांना देण्यासाठी भारत सरकारचे आयकर विभाग मार्फत पंढरपूर अर्बन बँकेचे कर्मयोगी सभागृहात

प्रतिनिधी रफिक आत्तार
पंढरपूर आयकर कायद्या संबधी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. विश्वास मुंढे, आयआरएस, संयुक्त आयकर आयुक्त, सोलापूर व पंढरपुरचे आयकर अधिकारी अजय घोगले यांनी टॅक्स भरण्याची प्रक्रिया समजावून सांगितलि.

पंढरपूर अर्बन बँकेचे कर्मयोगी सभागृहात आयोजित केलेल्या या कार्यक्रमात पंढरपूर येथील कर सल्लागार, सनदी लेखापाल, व्यापारी कमेटीचे अध्यक्ष प्रिन्स गांधी, पंढरपूर अर्बन बँकेचे व्हा.चेअरमन दिपक शेटे, सनदी लेखापाल अंकुश कौलवार, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.उमेश विरधे आदिसह व्यापारी वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता.

आयकर कायद्या संबधी जनजागृती कार्यक्रम संपन्न

आयकर अधिकारी श्री.अजय घोगले म्हणाले, प्राप्तीकर कायद्याचे सर्वसामान्यांना ज्ञान असणे गरजेचे आहे. प्राप्तीकर कायद्यात साक्षर झाले पाहिजे. यासाठी शासनाने हे जनजागृती कार्यक्रम सुरु केला आहे.

करपात्र मर्यादेनंतर प्राप्तीकर भरताना प्रमुख तीन टप्पे येतात. उत्पन्न मिळविणे, त्यानुसार योग्य ते नियमाप्रमाणे टॅक्स भरणे आणि त्यानंतर रिटर्नस दाखल करणे होय. एखाद्या वर्षी तोटा झाला तरीदेखील रिटर्नस दाखल करणे अत्यावश्यक आहे. रूपये १० हजार वरील टॅक्स भरणाऱ्या प्रत्येक करदात्याने अडव्हांस टॅक्स भरणे गरजेचे आहे.

आयकर का भरावा? याची माहिती देताना सोलापूरचे संयुक्त आयकर आयुक्त विश्वास मुंढे म्हणाले, या उत्पन्नामधून भारत सरकार प्रत्येक सर्वसामान्यासाठी अन्न, वस्त्र, निवारा अशा विविध मुलभूत गरजां सुरक्षित करणेसाठी योगदान देते. यासाठी योग्य कर भरून राष्ट्रहितासाठी योगदान करदात्यांनी द्यावे.

तसेच आयकर विभागाबद्दल भिती बाळगण्याची गरज नाही. नोकरी करणारे, व्यावसायिक, अधिक उत्पन्न असलेले नागरिक, मोठ्या रकमा मिळविणारे, भांडवल व्यवहार करणार्‍यांनी आयकर विवरण पत्र अर्थात इन्कम टॅक्स भरला पाहिजे. विवरण पत्र भरण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी आहे. नागरिकांनी त्यांबाबत शंका बाळगू नये. नियमितपणे विवरणपत्र भरणे गरजेचे आहे. तसेच कर्ज मिळविण्यासाठी पत वाढवियाची असेल तर विवरण पत्र भरण्याची नितांत आवश्यकता आहे.

या आयकर कायद्या संबधी जनजागृती कार्यक्रमावेळी उपस्थितांनी विविध शंका, प्रश्‍न विचारले. त्यास आयकर अधिकाऱ्यांनी समर्पक उत्तरे देऊन शंकाचे निरसन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पंढरपूर बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.उमेश विरधे यांनी केले तर आभार सनदी लेखापाल श्री.मर्दा यांनी मानले.

आयकर निरीक्षक चंद्रकांत बाबर आणि राहुल साळवे यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी नियोजन केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button