गरुडझेप
उडत्या पाखरांना दिशाची तमा नसावी
पंखात येवढे बळ यावे
आकाश ही सारे कवेत घ्यावे ….!
मला चांगल आठवत .आम्ही बालपणी उन्हाळी सुट्टी मधे माझ्या मावशीच्या गावाला जायचो .माझ्या मावशीचे नाव भिमाबाई ,माझ्या आजोबानी त्या काळात आपल्या मुलीचे नाव झाकच ठेवली होती ,मुलगा नाही म्हणून नकोशी असलेली नाव आपण समाजात पहातो पण माझ्या आजोबा आजी ने आपल्या तीन पोरीचे नाव सुंदर ठेवली होती.मोठी स्वप्न पाहिली होती त्याकाळात मुलीला शिकवाव अस ध्येय होत.दोन मुलीला नाही शिकवता आले पण धाकटी सलोचना मास्तरीन बनवली ,दोघी मुलीना नोकरदार मुल जावई म्हणून शोधली होती. भिमाबाई ,मालनबाई ,अन् सुलोचना ,दगडू आणि राजूबाईच्या पोटाला आलेल्या कन्या ,अतिशय स्वाभिमानी कष्टाळू , करारी आणि हो रुपाच्या खाणीच ! मोठी भिमाबाई .लहान पणीच लग्न भिमाच झाल ,आंबेजोगाई तालुक्यातील नांदडी या गावी दिल होत.माझे काका (इश्वर) म्हणजे आपचे बापू भारीच हरहूंन्नरी माणूस , शांत साध भोळ माणूस कष्टाळू ,लाल पटका धोतर अन् अंगरखा असा पेहराव.भिमाबाई अन् बापूची जोडी विजोडच होती ,बापू आणि काकूने अपार कष्ट सोशले .बापू सालगडी म्हणून काम करत होते. एकदा तर बापूला चोरानी मारले होते .बडगीर्याच्या वाड्यावर .बापू वाचतील की नाही खात्री नव्हती.त्या संकटातून वाचले बापूने जनावरांचे शेण देखील काढले होते. काकू अतिशय कष्ट करी बाई आणि तापड स्वभावाची ,नाकावर माशी बसू देत नसत ,आजी सारखच पेहराव असे ,कपाळावर रेखिव कोरलेल कुंकू नाकात नथ ,उंच सडपातळ बांधा ,नऊवारी साडी काष्टा जोरात!पूर्वी चांबड्याच्या चपला घालायची. असा हा पेहराव असे.दर शनिवारी नांदडीला बाजार भरत असे.आम्ही बाजाराची वाटच पाहत असू .बाजारातील शेव चिवडा आमच्या आवडीचा.कष्ट करुन ही मानस आभाळायेवढी होती.काकू कधीच रितीला चूकली नाही बहिणीच्या लेकरांना आंगड टोपड आणि झप्पर घालायला विसरली नाही .नियमाची पक्की होती ती .खाऊ भिऊ घालून लेकर खूष करायची .आणि हो बाजारात आपल्या माहेच कोण असेल तर काकू तिथ रेगांळणारच ! आपल्या बापावर भलत प्रेम तिच.परंतु बहुजनाच्या नशिबी मोल मजुरीच ! काकू दुसऱ्या च्या शेतात काम करत असत .खरच तिच्या कष्टाला मोल नव्हतं .घरामधे कोणीच शिकलेल नव्हत .मला आजही आठवत नांदडीतल ते घर ,चार पत्रे असलेली दगडामातीची खोली ,मातीन सारवलेली त्यावर त्या मातीच्या भिंतीवर एक काळा पांढरा फोटो लटकवलेला होता. त्या फोटोत एकच व्यक्ती समोरासमोर उभा असलेली फुल्याफुल्याच शर्ट टापटीप माणूस .हा माणूस कोण ? तर हा एक सैनिक काकूने आपल्या बहिणीच्या मालकाचा फोटो लावला होता .महादेव जावळे सलोचनाचे मालक होते. भारी अभिमान काकूला ! घर मात्र सुंदर समोर तुराट्याच्या काड्याचा कुड शेणाने लेपलेला .त्यातच तीच स्वयंपाक घर मातीची चूल , अंगणात नांदूरगीच आणि नारळाच झाड पुढे न्हाणी होती (बाथरुम) त्यात मातीच एक भांड होत .जमीनीत रोवलेल नांद आम्ही लेकर त्या खेळत बसायचो ,चुलीवरील स्वयंपाक आणि तिच्या हातशी भाजी आहाहह .अन् तीन आणलेली चिंदकातील भाकरी काय तो स्वाद आज पण रेगांळतो जीभेवर .अंगण घर अतिशय निर्मळ ,तीचा मोठा मुलगा विकास मुलगी अरुणा आणि दुसरा प्रकाश आडाणी असून भारीच नाव ठेवलेली होती आपल्या लेकराची.

विकास अन् प्रकाशच बालपण आंजोळी गेल इस्थळ या ठिकाणी , विकास प्रकास मोठे होत होते , विकास भाऊ तसा हूशारच होता ,धडपड करणार व्यक्तीमत्व , सुलोचना मावशी घरात शिकलेली ,मास्तरीन झाली होती म्हणून भिमाबाई आपल्या लेकराला मावशी सारखे शिका तगादा लावत असे ,विकास भाऊ मावशीला भेटायला नांदडी ते मुरुड प्रवास 35 कि.मी सायकलीवर करायचा,आम्ही भावंड मजा मस्ती करायची विकास भाऊचा इंग्रजी विषय आवडीचा .विकासभाऊचे प्राथमिक शिक्षण नांदडी येथे झाले व माध्यमिक शिक्षण बनसारोळा ता.केज येथे झाले वस्तीगृहात राहून शिक्षण घेतले होते ,दहावी उत्तम गुण घेऊन उत्तीर्ण झाला .आता सुलोचना मावशी ने सुचलवे विकास आता तू 10 वर डि .एड कर .तेव्हा विकास भाऊ म्हणाला ,”नाही मला मास्तर होयच नाही मोठा अधिकारी होयचय ! त्या नंतर त्याने अंबेजोगाई येथिल योगेश्वरी कॉलेज मधे पदवीचे शिक्षण पूर्ण केले,घरची हालाकीची परिस्थिती आई वडील मोल मजुरी करुन घर भागवत असे.त्यातील आसा एक प्रसंग शिक्षणासाठी काकूने घरातील पितळाचे भांडे विकले होते .विकास भाऊ आपल्या मागासवर्गिय शिष्यवृत्तीवर आपल्या शैक्षणिक गरजा भागवत असे वेळ प्रसंगी शेतातील काम पण करत ,पदवी शिक्षण झाले आणि आज प्रश्न बेकारीचा राक्षस आ करुन उभा आहे.तसाच त्यावेळी पण नोकरी मिळेना मोठ होण्याच स्वप्नासाठी परिस्थिती आड येऊ लागली ,इंग्रजी विषय घेऊन विकास भाऊने SRT कॉलेज अंबेजोगाई येथे पदवी पूर्ण केली .कधी कधी मावशीकडे आल्यावर आम्हा भावंडांना इंग्रजी शिकवत असे ,घरीच आमची शाळा भरत असे मजा यायशी शिकायला .
नोकरी मिळण्यासाठी एका शिक्षण संस्थेत शिक्षक म्हणून बीन पगारी काम केले ,त्यानंतर अनुभवावर यशवंतराव मुक्त विध्यापीठ नाशिक येथून बी.एड शिक्षण पूर्ण केले ,अतिशय खडतड प्रवास शिक्षणासाठी केला ,आधाराचा वड आणि मायेची सावली विकास भाऊ साठी म्हणजे त्याच्या मावश्या सुलोचना आणि मालन यांच्या कडे सतत यायचा परिस्थितीतून मार्ग काढण्याचा प्रयत्न स्वतः करायचा .
त्यानंतर विकासभाऊचे लग्न झाले तेव्हा पहिल लग्न अगदी काही दिवसात काडी मोडी झाली ,निराश आणि हताश विकास भाऊ शांत बसला नाही ,बिकट परिस्थितीला वेळच औषध आसते हे खरे !काही दिवस असेच गेले त्यानंतर डि.एड झालेली मुलगी पाहण्यात आली .विचाराचे धागे जुळवून आले आणि आशा गवळी विकास भाऊची आयुष्यमती बनली ,डि.एड शिक्षण पूर्ण करण्यासाठी विकासभाऊच सरसावला त्याच्या प्रयत्नाने आपल्या पत्नी चे शिक्षण पण पूर्ण केले .
शिक्षण होत पण नोकरी नव्हती .दोघही नोकरीच्या शोधात होते ,कुठे तरी संस्थेत नोकरी मिळाली तर संसाराच गाडग आळ्यावर बसेल अशीच आशा .मुरुड येथिल जनता विध्यामंदीर येथे काही दिवस विनाअनुदानीत तुकडीवर आशा ताईने काम केले .त्यावेळी मावश्याचाच आधार .रटपटकरीत दिवस जात होते ,आता विकास भाऊ ला एक मुलगी अन् मुलगा पण झाला होता.अशा परिस्थितीत ते संसाराचा गाडा ओढायला चालू होते.
दिवस जात होते. तीच वेळ राहत नाही ,वेळ बदलत होता. आता विकास भाऊच्या पत्नीला सरकारी नोकरी शिक्षिका या पदासाठीचा आदेश आला ,आनंद गगनात मावेना ,पहिली पोष्टींग बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील गावात मिळाली .विकास भाऊ त्याची पत्नी आशा लहान लेकर म्हणजे अनिता ,वैभव व सर्व गोतावळा म्हणजे मावशी मावस बहिणी ,भाऊ त्या गावाला जॉईन होण्यासाठी लवाजमा !या मंडळीला सोडण्यासाठी तयारच!आनंदी आनंद ….
सरकारी नोकरी म्हटल काय विचारायला सोय नको .आम्ही सर्व लवाजमा त्या नोकरीच्या गावी निघालो ,एक भाड्याने जीप केलेली जुणी खट्याड .लाथ मारली की एक एक पार्ट गळून बाहेर पडतील की काय अशी ,त्यात जीपचे चाक अतिशय मुलामय गुळगुळीत .आम्ही काय गाडी हाय म्हणून आनंदाच्या भरात ,सर्व गोतावळा त्या जीपीत ! जीप डुगूडुगू चालत होती ,पावसाळ्याचे दिवस होते आपची जीप कळंब नजीक होती ,समोर एक भला मोठा नाला होता ,त्यावर पुल बांधलेला .पुलावरण आमची जीप निघाली अचानक ! जीप गर्रर्रकन फिरली ,अरे हे काय होयलय म्हणून सर्व पाहत होती .जीपच समोच तोंड अचानक माघे झाले ,जीप आमची जात्यागत फिरत होती .फिरत फिरत एका दगडाला येऊन थांबली ,जीप मधील सर्व आता काही खर नाही, जीवाच म्हणून ओरडत होती .मी समोर पाहिले तर भला मोठ्ठा खड्डा त्यात पाणी! कोणत्याही क्षणी जीप जलसमाधी घेणार होती .माघील पुढील वाहन जिथल्या तिथ थांबलेली ,बाजूची इतर वाहणातील मानस गाडीतून उतरून म्हणून होती ,गेली गेली आता परंतु एका दगडावर जाऊन जीपचा खालचा भाग ठेकला होता .त्या मुळे जीप झोका खात होती .भयानक दृश्य ! जीप थांबल्या थांबल्या मानस धावत आली .आम्हाला सर्वाना बाहेर काढले,नंतर जीपला जाण्याच्या मार्गवर जीपच तोंड केल .मग काय !जीव भांड्यात पडल्यागत आम्ही त्या अपघातातून सुखरुप बाहेर पडलो. हळूहळू दिवस जात होते विकास भाऊला अनखी मनासारखी नोकरी मिळाली नव्हती.त्याचे अनंत प्रयत्न चालूच होते.एक दिवस त्याला पण नामवंत संस्थेत माध्यमिक शिक्षक म्हणून जॉब मिळाला.
दिवस पलटले होते दोघ पती पत्नी शिक्षक म्हणून नोकरी करत होते .अर्थ वेवस्था जरा बरी होत होती .पण विकास भाऊचे मोठ्ठ होण्याच स्वप्न सतावत होते .तो शिकवणी घेत असे त्यान आपल्या इंग्रजी या विषयावर प्रभुत्व मिळवल होत.
आपले स्वप्न मुलांनी तरी पूर्ण करावे असे त्याला वाटू लागले ,आपल्या मुलांना चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळायला हवे असे वाटत होते.म्हणून आपला मोठा मुलगा वैभव याचे प्राथमिक शिक्षण योगेश्वरी शिक्षण संस्था अंबेजोगाई येथे पूर्ण केले त्यानंतर पुढील शिक्षणासाठी लातूर येथे स्थलांतर केले. त्याची पण नोकरी लातूर मधेच शंभूलिंग माध्यमिक शाळा लातूर येथे होती त्यामुळे वैभव आणि विकासभाऊ भाड्याच्या खोलीत राहू लागले,वैभव आता दहावीत होता त्याने देशीकेंद्र शाळेत पहिला क्रमाक बोर्डाच्या परिक्षेत मिळवला ,वैभव बापाची स्वप्न पूर्तीच्या मार्गक्रमन करत होता.त्यानंतर वैभवने लातूर येथिल शाहू कॉलेज मधे विज्ञान शाखेत प्रवेश घेतला .विकासभाऊचे मार्गदर्शन आणि वैभवची जिद्द कामी येत होती ,वैभव झपाटल्यागत अभ्यास करत होता .या लेकराने अभ्यासापोटी मजा मस्ती करायचे सोडून दिले होते .कित्येक दिवस बेसन भाकरीवर दिवस काढले .बारावीला देखिल वैभव मागासवर्गीय प्रवर्गातून प्रथम क्रमांक पटकावला. यशाचे शिखरे गाटत होता .त्यानंतर COEP महाविद्यालय पुणे येथे मेकॕनिकल शाखेत अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केले .तिथ पण खूप परिश्रम घेतले ,इंजिनेरींग पदविका पूर्ण करत करत तो स्पर्धा परिक्षा अभ्यास करत होता . केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परिक्षेची तयारी करु लागला . दिल्ली येथे अवघे 6 महिने स्पर्धा परिक्षेचे क्लास लावले होते .सन 2018-19 मधे पहिली लोकसेवा आयोगाची परिक्षा दिली यश आले नाही .त्यानंतर सन 2019-20 मधे दुसरी परिक्षा वैभवने दिली दुसऱ्या प्रयत्नात वैभवला यश संपादन झाले .देशात 771 रॕक ने वैभव उत्तीर्ण झाला .
बापाच स्वप्न लेकान पूर्ण केल .जिद्द काय असते ते विकास भाऊ कडून शिकावे .बहुजनातील च लेकरु छोट्या खेड्यातील हे ध्येय वेड पोरग काय करु शकत हे उत्तम उदाहरण.
काकू (मावशी) विकास भाऊ आणि वैभव तुम्हाला मानाचा मुजरा ..
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची समाजासाठीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुझी सेवा घडोत .वैभव ज्या समाजात जन्माला आलोत त्याची परत फेड करण्यासाठी तुझी जिद्द कामी येवोत ,समाजासाठी सेवा घडत राहो हिच सदिच्छा.
अनिता जावळे-वाघमारे
जि.प.प्रा.शा.बोरगाव काळे
ता,जि.लातूर
9545050292






