Pandharpur

पंढरपूर-सांगोला मार्गावर भीषण अपघात अपघातांमध्ये दोन ठार

पंढरपूर-सांगोला मार्गावर भीषण अपघात अपघातांमध्ये दोन ठार

रफिक आतार पंढरपूर

पंढरपूर : पंढरपूर सांगोला मार्गावर झालेल्या एका भीषण अपघातात दोन जण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. फॅबटेक कॉलेजजवळ हा अपघात झाला. पंढरपूर सांगोला रस्ता रुंद केल्यापासून या मार्गावर आजवर अनेक अपघात झाले असून अपघाताचे हे चक्र सुरूच आहे. आजवर अनेक जीव या मार्गावरील अपघातात गेले असून आज पुन्हा दोन जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. टेम्पो आणि पिकअप यांच्यात आज हा अपघात झाला आहे. पंढरपूरकडून सांगोल्याच्या दिशेने भरधाव वेगाने निघालेला टेम्पो (एम एच २० सि टी ९१०५) आणि सांगोल्याकडून पंढरपूरकडे येत असलेला पिकअप (एम एच १० सी एम १२३०) या दोन वाहनात फॅबटेक कॉलेजजवळ समोरासमोर एकमेकास जोराने धडकले. या अपघात दोघांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. या जखमीस सांगोला ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे.
अपघातात मृत्युमुखी पडलेल्या आणि जखमी झालेल्यांची नावे समजू शकली नाहीत. हा अपघात एवढा भीषण होता की अपघातग्रस्त वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. सांगोला पोलिसांना माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि रस्त्यावरील अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button