Amalner

अमळनेर : अतिवृष्टी मुळे झालेल्या नुकसान भरपाई यादीत नाव समाविष्ट न केल्याबद्दल चौकशी व्हावी शिरूड च्या शेतकऱ्यांचे तहसीलदारांना पत्र..

अमळनेर : अतिवृष्टी मुळे झालेल्या नुकसान भरपाई यादीत नाव समाविष्ट न केल्याबद्दल चौकशी व्हावी शिरूड च्या शेतकऱ्यांचे तहसीलदारांना पत्र..

अमळनेर सन २०/२१ साली झालेल्या वादळी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान
भरपाई यादीतुन नाव वगळण्यात आली.अशी तक्रार रा. शिरुड ता. अमळनेर जि. जळगांव श्री. दत्तात्रेय भिका बोरसे (कोतवाल) मौजे शिरुड, शिवारातील शेताची पाहणी करत असतांना सोबत तलाठी मॅडम यांचे पती व कोतवाल या दोघांनी सर्वे केला होता. तलाठी नॅडम हजर नसतांना पती ने केलेला नुकसानीचा पंचनामा योग्य आहे का कोतवाल यांच्या शेतात ज्वारी आणि मक्का असे कोणत्याही प्रकारचे पिक नसतांना त्यांच्या शेतात फक्त हरभरा चे पिक होते, तरी त्यांचे नुकसान भरपाई यादीत नाव आले आहे. आमचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे नाव वगळून कोतवाल यांचे नाव समाविष्ट करण्यात आले. आम्ही त्यांच्या शेताच्या बांधाला लागून आमचे मक्का हे पिक असतांना जवळ जवळ ५०/६० टक्के नुकसान झाले असल्यावर आमची नावे यादीतुन वगळण्यात आली जवळ पास १५/२० शेतकरी कोतवालच्या शेताला लागुन आहेत. आमचे सर्व शेतकऱ्यांचे बागायत पिकाचे नुकसान झाल्यावर एकही शेतकऱ्यांचे नाव यादीमध्ये नाही. मग एकट्या कोतवालाचे पिक नसतांना नुकसान झाले कसे आम्ही पात्र असतांना आमची नावे यादीतुन वगळण्यात आली तलाठी व कोतवाल यांच्यावर प्रशासन यांनी चौकशी करावी व आम्हा सर्व नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना न्याय द्यावा व अनुदानाचा लाभ मिळावा हि नम्र विनंती.
भास्कर वना पाटील, निंबा सिताराम धनगर, भालेराव चिंतामण पाटील, वसंत भगवान पाटील, भिका नामदेव पाटील, संजय आनंदा पाटील, लोटन निंबा पाटील प्रल्हाद तुळशिराम पाटील, अनिल नामदेव पाटील,कैलास महारू मोरे,शरद पोपट पाटील, दंगल पोपट पाटील,पुंजू एकोबा पाटील यांनी तहसीलदार यांच्या कडे केली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button