नगरपालिकेच्या आवाहनाप्रमाणे त्वरित स्थलांतर करावे:- .
प्रशासनाने दिलेल्या सुचनेचे पालन करा :-
अफवांवर विश्वास ठेवू नका विवेक परदेशी, आरोग्य सभापती
अतिरिक्त पर्जन्यमानामुळे चंद्रभागा नदीची पाणी पातळी वाढत आहे गत वर्षीच्या पुर परिस्थिती प्रमाने पाणी पंढरपूर शहरात पाणी येणार आहे. सदर प्रसंगी मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, प्रांताधिकारी सचीन ढोले, आरोग्य सभापती विवेक परदेशी यांनी वाढत्या पाणीची पाहणी करुन नागरिकांना दक्ष राहण्याच्या सूचना दिल्या
पुर रेषेखालील राहणाऱ्या नागरिकांना त्वरित स्थलांतर होण्याबाबत सूचना प्रशासनाच्या वतीने देण्यात आल्या
सोशल मीडिया वरील कोणत्याही अफवेवर विश्वास न ठेवता त्वरीत स्थलांतर करावे. काही अडचण आल्यास अथवा आपत्ती परिस्थिती निर्माण झाल्यास तरीच नगरपालिका प्रशासनास संपर्क करा अशाही सूचना यावेळी देण्यात आले
नदीच्या पाणीपातळी बद्दल प्रशासनाच्या , नगरपालिकेचे वतीने वरचेवर अधिकृत माहीती देण्यात येत आहे. प्रत्येक भागात नगरपालिकेचे , प्रशासनाचे प्रतीनिधी कार्यरत आहेत.
पर्जन्यमानाला थांबवणे आपल्या हातात नाही, पण येणाऱ्या परिस्थितीचा सामना आपण सर्वजण मिळून करावयाचा आहे.
प्रशासनाच्या सुचनेकडे लक्ष द्यावे हि नम्र विनंती. नागरिक प्रशासन मिळुन आपण या संकट काळातुन आपण बाहेर पडण्याचा प्रयत्न करु असे सांगण्यात आले.






